हिंमत असेल तर… शिवसैनिकांच्या अटकेनंतर धमकी देणाऱ्या संतोष बांगर यांना शिवसेनेचे ओपन चॅलेंज

| Updated on: Sep 26, 2022 | 5:59 PM

कधी कोणत्या दिवशी यायचे मी चौकात उभा आहे असे म्हणून संतोष बांगर यांनी शिवसेनेला डिचवले. यानंतर शिवसेवनेने त्यांचे चॅलेंज स्वीकारले आहे.

हिंमत असेल तर... शिवसैनिकांच्या अटकेनंतर धमकी देणाऱ्या संतोष बांगर यांना शिवसेनेचे ओपन चॅलेंज
संतोष बांगर
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर( Santosh Bangar) यांना अमरावतीत शिवसैनिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. अंजनगाव सुर्जीमध्ये संतप्त शिवसैनिकांनी बांगर यांच्या ताफ्यावर हल्ला चढवला होता. या प्रकरणी 11 शिवसैनिकांना अटक झाली आहे. बायको आणि बहिण सोबत नसते तर हल्लेखोरांना जशास तसे उत्तर दिले असते असं म्हणत संतोष बांगर यांनी हल्ले खोरांना थेट धमकीच दिली होती. धमकी देणाऱ्या संतोष बांगर यांना आता शिवसेनेने(Shiv Sena) ओपन चॅलेंज दिले आहे.

माझी बहीण आणि माझी पत्नी जर माझ्यासोबत नसत्या तर  संतोष बांगर काय आहे हे त्या ठिकाणी मी त्यांना सांगितलं असतं. एक घाव दोन तुकडे केले असते अशी धमकीच बांगर यांनी दिली आहे.

कधी कोणत्या दिवशी यायचे मी चौकात उभा आहे असे म्हणून संतोष बांगर यांनी शिवसेनेला डिचवले. यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर सूर्यवंशी यांनी संतोष बांगर यांच आव्हान स्वीकारत त्यांना ओपन चॅलेंज दिले आहे.

हिंतत असेल तर संतोष बांगर यांनी पोलीस बंदोबस्त बाजूला सारून समोर यावे. कधी येता? किती लोक घेऊन येता? वेळ काळ ठरवा, तेव्हा दाखवेल तुम्हाला ओरिजनल बाळासाहेबांचा शिवसैनिक कोण आहे असे सूर्यवंशी म्हणाले.

संतोष बांगर हल्ला प्रकरणी 11 शिवसैनिकांना अटक

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे काल आपल्या कुटुंबासह अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे मठामध्ये देव दर्शनासाठी आले होते.

यावेळी अंजनगाव सुर्जी येथील काही शिवसैनिकांनी संतोष बांगर यांच्या वाहनावर हल्ला चढविला. पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणा देखील केल्या.

अंजनगाव पोलिसांनी या प्रकरणी पंधरा ते वीस शिवसैनिकांवर 353 सह विविध कलमानुसार गुन्हा दाखल केलेला आहे. 11 शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले असल्याची माहिती ठाणेदार दीपक वानखडे यांनी दिली.