महाविकास आघाडीचे सरकार तीन तोंडाचे, विनायक मेटेंचा ठाकरे सरकारवर घणाघात

| Updated on: Dec 30, 2019 | 9:44 PM

ठाकरे सरकारने मित्रपक्षांना दिलेल्या आश्वासनाचा भंग केला असून या सरकारची वाट वाटते तेवढी सोपी नाही, तसेच हे सरकार तीन तोंडाचे आहे, असे म्हणत विनायक मेटे यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली.

महाविकास आघाडीचे सरकार तीन तोंडाचे, विनायक मेटेंचा ठाकरे सरकारवर घणाघात
Follow us on

बीड : राज्याच्या जनतेला ज्याची प्रतिक्षा होती तो ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज अखेर पार पडला. यामध्ये 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये राष्ट्रवादीच्या 14, शिवसेनेच्या 12, तर काँग्रेसच्या 10 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र, यामध्ये मित्रपक्षातील एकाही आमदाराला मंत्रिपद देण्यात आलेलं नाही. महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षाच्या मित्रपक्षांनी त्यांना निवडणुकीत तसेच, सरकार स्थापन करण्यात मदत केली. मात्र, तरीही मित्रपक्षातील एकाही आमदाराला मंत्रिमंडळात जागा देण्यात आलेली नाही. त्यामुळे मित्रपक्ष सरकारवर नाराज आहे (Thackeray Govt Cabinet Expansion).

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारावर शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी जोरदार टीका केली. ठाकरे सरकारने मित्रपक्षांना दिलेल्या आश्वासनाचा भंग केला असून या सरकारची वाट वाटते तेवढी सोपी नाही, तसेच हे सरकार तीन तोंडाचे आहे, असे म्हणत विनायक मेटे यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली.

“आधीच या तीन पक्षाचे तीन तोंडं आहेत. त्यामध्ये प्रत्येक पक्षाचे मित्रपक्ष आहेत. या सर्व मित्रपक्षांनी या तीन पक्षांना सरकार स्थापन करण्यासाठी समर्थन दिलं, मदत केली. या लोकांनी पूर्वी आश्वासनं वेगळी दिली आणि आता जेव्हा करायची वेळ आली, तेव्हा त्यांनी आश्वासनांचा भंग केला. अशा पद्धतीचं वर्तण मित्रपक्षांसोबत केलं. याचा परिणाम निश्चितच येणाऱ्या काळात होईल. त्यामुळे या सरकारची वाट आपल्याला वाटते तेवढी सोपी नसणार आहे”, असं म्हणत विनायक मेटेंनी सरकार विरुद्धचा आपला रोष व्यक्त केला.

ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार

विधानभवन परिसरात महाविकास आघाडीच्या 36 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 36 आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. यामध्ये 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विस्तारामध्ये राष्ट्रवादीच्या 14, शिवसेनेच्या 12, तर काँग्रेसच्या 10 मंत्र्यांनी शपथ घेतली. अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, आदित्य ठाकरे यांच्यासह 36 मंत्र्यांचा शपथविधी झाला. यावेळी मंत्र्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते.

Vinayak Mete on Thackeray Govt Cabinet Expansion