युतीचा फॉर्म्युला ठरला, शिवसेनेच्या या तीन अटी भाजपकडून मान्य

| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्या युतीची अखेर घोषणा झाली. भाजपाध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख यांच्या उपस्थितीत मुंबईत ही घोषणा झाली. युतीचा फॉर्म्युला आणि शिवसेनेच्या अटी याबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच माहिती दिली. महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. यापैकी शिवसेना 23 आणि भाजप 25 जागांवर लढणार आहे. शिवसेनेच्या तीन अटी […]

युतीचा फॉर्म्युला ठरला, शिवसेनेच्या या तीन अटी भाजपकडून मान्य
Follow us on

मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्या युतीची अखेर घोषणा झाली. भाजपाध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख यांच्या उपस्थितीत मुंबईत ही घोषणा झाली. युतीचा फॉर्म्युला आणि शिवसेनेच्या अटी याबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच माहिती दिली. महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. यापैकी शिवसेना 23 आणि भाजप 25 जागांवर लढणार आहे.

शिवसेनेच्या तीन अटी

युतीच्या चर्चेपूर्वीच शिवसेनेकडून काही अटी ठेवण्यात आल्या होत्या. शेतकरी प्रश्नांसह अनेक अटी भाजपने मान्य केल्या. यापैकी पहिली अट म्हणजे लोकसभेचा फॉर्म्युला. शिवसेना 23 आणि भाजप 25 जागा लढणार आहे. 2014 च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने 48 जागांपैकी 42 जागा जिंकल्या होत्या. 2014 ला भाजपने काही जागा मित्रपक्षांनाही सोडल्या होत्या. पण यावेळी ही युती फक्त शिवसेना आणि भाजप यांचीच आहे.

दुसरी अट म्हणजे विधानसभेचा फॉर्म्युला. या पुढच्या सर्व निवडणुका शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. विधानसभेलाही निम्म्या निम्म्या जागा लढवल्या जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी मित्रपक्षांशी चर्चा केली जाईल आणि उरलेल्या जागा निम्म्या निम्म्या लढवल्या जातील, असं मुख्यमंत्री म्हणाले.

शिवसेनेची तिसरी अट म्हणजे कोकणातील नाणारमधला रिफायनरी प्रकल्प. या प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केल्यानंतर शिवसेनेनेही या प्रकल्पाला विरोध केलाय. स्थानिकांनी शिवसेनेकडे हा प्रकल्प रद्द करण्यासाठी दाद मागितली होती. त्यामुळे हा प्रकल्प दुसरीकडे हलवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तयारी दाखवली आहे. जिथे जागेचा प्रश्न नसेल तिथे हा प्रकल्प हलवला जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

पाहा व्हिडीओ :