शिवसेना-भाजप युतीचा ‘नगारा’ 3 डिसेंबर रोजीच वाजला होता?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

वाशिम : भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाल्यापासून या दोन पक्षात एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सातत्याने झाला. त्यामधूनच दोन्ही पक्षांनी स्वबळाची भाषा केली. अखेर सोमवारी भाजपाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्वव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून भाजपा-शिवसेनेचे संबंध मधूर होत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. 3 […]

शिवसेना-भाजप युतीचा नगारा 3 डिसेंबर रोजीच वाजला होता?
Follow us on

वाशिम : भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाल्यापासून या दोन पक्षात एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सातत्याने झाला. त्यामधूनच दोन्ही पक्षांनी स्वबळाची भाषा केली. अखेर सोमवारी भाजपाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्वव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून भाजपा-शिवसेनेचे संबंध मधूर होत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. 3 डिसेंबर रोजी वाशिममधील पोहरादेवी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर स्तुतीसुमने उधळून संत सेवालाल महाराजांच्या पवित्र भूमित नगारा वाजवला. त्यामुळे भाजपा-शिवसेना युतीचा नगारा वाजल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती.

सर्वसामान्य कार्यकर्त्यांची नाडी अचूक ओळखून प्रसंगी कार्यकर्त्यांसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या पुंडलीकराव गवळी यांच्या राजकारणाचा वारसा त्यांच्या कन्या विद्यमान खासदार भावना गवळी यांनी समर्थपणे पेलला. या जनसंपर्काच्या जोरावरच खासदार भावना गवळी यांनी 1999 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते अनंतराव देशमुख यांचा पराभव केला. 2004 च्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे वजनदार मंत्री मनोहर नाईक यांचा पराभव केला. 2009 मध्ये काँग्रेसचे हरीभाऊ राठोड यांचा पराभव करून खासदार गवळींनी विजयाची हॅटट्रीक साधली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे वजनदार मंत्री शिवाजीराव मोघे यांना पराभूत करून खासदार गवळी यांनी संसद गाठली.

या 20 वर्षाच्या कार्यकाळात जिल्ह्याच्या शिवसेनेत भावना गवळींचा शब्द प्रमाण मानला जात होता. इतर पक्षात होणारी फंदफितुरी शिवसेनेत नावालाही दिसत नव्हती. मात्र, गेल्या चार महिन्यापासून जिल्ह्याच्या शिवसेनेत दोन गट पडल्याचे चित्र समोर येत आहे. यामध्ये खासदार भावना गवळी समर्थक एकीकडे, तर दुसरीकडे शिवसेनेचे पालकमंत्री संजय राठोड यांचे समर्थक अशी सरळ विभागणी झाली आहे. मात्र, खासदार भावना गवळी यांची पक्षसंघटनेवरील पकड आणि त्यांचा जनसंपर्क हिच त्यांची जमेची बाजू असल्याने विरोधी गट जिल्ह्यात एल्गाराची भानगड आता या भाजप-शिवसेना युतीत मावळेल का हा प्रश्न उपस्थित होतोय.