Breaking! महाराष्ट्राच्या राजकारणात 15 दिवसात भूकंप… शरद पवार सत्तेत? शिंदेंच्या नेत्याने तारीखही सांगितली!
15 डिसेंबर नंतर शरद पवार राज्याच्या सत्तेत दिसतील, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. कोणत्याही विलिनीकरणाशिवाय हे होणार आहे, असंही बच्चू कडू म्हणालेत.

Maharashtra Politics News: राज्यासह देशाच्या राजकारणात डिलिमिटेशन विधेयकावरुन वातावरण ढवळून निघाले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने या विधेयकाला पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. शरद पवार यांची राष्ट्रवादी सत्तेत जाणार असेही बोलले जात आहे. अशातच आता शिवसेना शिंदे गटाच्या बड्या नेत्याने पंधरा दिवसात राज्याच्या राजकारणात भूकंप होणार असल्याचा दावा केला आहे.
काय म्हणालेत बच्चू कडू?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिल्यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे शरद पवार यांचाही सत्तेच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे, असा थेट दावा बोलला जात आहे. अशातच याबाबत आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीबाबत सर्वात मोठा दावा केला आहे. 15 डिसेंबर नंतर शरद पवार राज्याच्या सत्तेत दिसतील, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. कोणत्याही विलिनीकरणाशिवाय हे होणार आहे, असंही बच्चू कडू म्हणालेत.
त्याचबरोबर ६ डिसेंबर रोजी सायकलने प्रवास करत नागपूरच्या दिशेने निघणार आणि अधिवेशनाला पोहोचणार आहे. नागपूर अधिवेशनावर ‘त्रिशूळ आंदोलन’ छेडणार असून विधानसभेसमोर त्रिशूळ रोवण्याचा इशाराही यावेळी बच्चू कडू यांनी दिला आहे. हे आंदोलन शिवसेना आणि प्रहार यांच्या संयुक्त माध्यमातून होणार आहे, असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे.
अधिवेशनात कोणत्या मागण्या करणार?
तेलंगणाच्या धर्तीवर या अधिवेशनात ‘मायक्रो फायनान्स’ कायदा आणण्याची मागणी करणार असून खासगी सावकारी/पठाणी वसुली तात्काळ थांबली पाहिजे, असेही आमदार बच्चू कडू यावेळी म्हणालेत. कर्जमुक्ती किंवा कर्जमाफीतून सुटलेल्या सर्व शेतकऱ्यांचा कर्जमाफीत समावेश करावा, ५० हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी अद्याप मिळालेला नसून, तो सरसकट देण्यात यावा. दुष्काळात शेतकऱ्यांप्रमाणेच मजूर, दिव्यांग आणि एकल महिलांनाही आर्थिक अनुदान मिळावे अशा मागण्याही बच्चू कडू यांनी केल्या आहेत.
दरम्यान, अदाणींच्या मेळघाटातील प्रकल्पावरुनही बच्चू कडू यांनी मोठे विधान केले. आम्ही या प्रकल्पा बाबत संपूर्ण माहिती घेऊ, त्यानंतरच पुढील भूमिका घेऊ, त्यात केवळ अदाणींचा फायदा होणार असेल तर तिथे पाय देखील ठेऊ देणार नाही. प्रकल्प पुण्यात होतात म्हणून रोजगारासाठी विदर्भातील तरुण जातो आहे. अदाणींच्या प्रकल्पामुळे १००० झाडं तुटत असतील तर त्या बदल्यात १० हजार झाड लावली जात असतील, असे म्हणत अदाणींच्या प्रकल्याला थेट विरोध करणार नाही. संपूर्ण माहिती घेऊनच भूमिका स्पष्ट करू, अशी भूमिकाही यावेळी बच्चू कडू यांनी मांडली आहे.