प्रचारादरम्यान अयोग्य वागणूक, शिवसेना पदाधिकाऱ्याने माफी मागावी, मराठी अभिनेत्रीची मागणी

| Updated on: Jan 12, 2020 | 2:32 PM

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री भाग्यश्री मोटे हीने नुकतंच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला (actor bhagyashree mote criticises shivsena) आहे.

प्रचारादरम्यान अयोग्य वागणूक, शिवसेना पदाधिकाऱ्याने माफी मागावी, मराठी अभिनेत्रीची मागणी
Follow us on

चंद्रपूर : मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री भाग्यश्री मोटे हीने नुकतंच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला (actor bhagyashree mote criticises shivsena) आहे. त्यात तिने गडचांदूर या ठिकाणच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आली असता शिवसेनेकडून योग्य वागणूक मिळाली नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे शिवसेनेचे राजुरा विधानसभेचे संपर्क प्रमुख मिथुन खोपडे यांनी माझी आणि माझ्या सहकारी मैत्रिणीची माफी मागावी अशी मागणी केली आहे.

तुम्ही जेव्हा एखाद्या कलाकाराला बोलवता तेव्हा त्यांना अशाप्रकारची वागणूक देणं चुकीचं आहे. माझी ही तरतूद आहे, की शिवसेनचा मिथुन खोपडे हा विधानसभेतील लोकसंपर्क अधिकारी आहे. ज्याने आमच्यासोबत हा सर्व प्रकार केला आहे. त्यांनी आमची माफी मागावी अशी मागणी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने केली आहे. मिथुन खोपडे यांच्यावर हे सर्व आरोप करण्यात आले आहे. खोपडे हे शिवसेनेचे राजुरा विधानसभेचे संपर्क प्रमुख (actor bhagyashree mote criticises shivsena) आहेत. दरम्यान या सर्व प्रकरणानंतर मिथुन खोपडे यांनी भाग्यश्री मोटेनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.

भाग्यश्री मोटे यांची इंस्टाग्राम पोस्ट

“नमस्कार मी भाग्यश्री मोटे, मी हा व्हिडीओ काल (8 जानेवारी झालेल्या प्रकरणावरुन रेकॉर्ड करते. मी कार्यक्रमानिमित्त नागपूरला गेले होते. त्या ठिकाणाहून आमचा कार्यक्रम 180 किमीवर होता. चंद्रपूरच्या पुढे गडचांदूर येथे होता. माझी फ्लाईट सकाळी 6.20 ची होती. ती त्या ठिकाणी 7.45 ला पोहोचली. मला 9 वाजेपर्यंत कोणीही घ्यायला आले नाही. त्यानंतर 9.15 वाजता माझी मैत्रिण त्या ठिकाणी आली. त्यानंतर त्यांची माणस आली.

यानंतर आमचं एका ठिकाणी थोडावेळ थांबायचं ठरलं होतं. मात्र कार्यक्रमाला उशीर होईल असे सांगत आपण निघू या. त्यामुळे मी माझ्या रेडी होण्याची जी काही व्यवस्था केली होती. ती पुढे ढकलली. आपण चंद्रपुरात तुमची राहण्याची सोय केली आहे. त्या ठिकाणी तुमच्या राहण्याची आणि तयारीची सोय केली आहे. तुम्ही तिथे तयार व्हा. त्या ठिकाणाहून आम्ही चंद्रपूरला गेलो. त्या ठिकाणी थोडा आराम केल्यानंतर आमच्या रेडी होण्याची काही सोय आहे का. तेव्हा त्यांनी ते तुमचं तुम्हाला बघावं लागेल आणि तुम्हाला त्याचे पैसे भरावे लागतील. नागपूरमधून आम्हाला घेऊन जात असताना आम्ही ते देऊ असे सांगितले होते.

चंद्रपूरला गेल्यानंतर ज्या हॉटेलचे बुकिंग केले असे सांगण्यात आले होते. तेही फुल असल्याने ते बुक केलं नव्हतं, तसेच त्याऐवजी आम्हाला एका साधारण हॉटेलमध्ये राहण्यास सांगितले. त्याठिकाणी आम्ही आराम केला. तुम्हाला रेडी व्हायचं असल्यास व्हा किंवा तसाच आलात तरी चालेले आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही. असे अनप्रोफेशन ते आमच्याशी बोललं. आम्ही तीन दिवस रिर्टन तिकीट बाबत विचारत होते. मात्र तेही त्यांनी केलं नव्हत. जेव्हा आम्ही रेडी झालो. त्यावेळी आम्ही जोपर्यंत तुम्ही रिर्टन तिकीट केलं तर आपण निघूया. मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तर देऊन टाळाटाळ केली. यानंतर आमच्यावर प्रेशर टाकून कार्यक्रमाला लेट होईल, तुमची बदनामी होईल असे सांगण्यात आले.

आम्ही चंद्रपुरातून निघाल्यानंतर जवळपास पावणे सहा ते सव्वा आठ पर्यंतचा वेळ मी त्या कार्यक्रमाला अडीच तास दिला. त्यावेळी आम्ही रिर्टन तिकीटची विचारणा केली. मात्र त्याने मॅसेज बघितले नाही, फोनला उत्तर दिली नाही. मी आता कार्यक्रमाला अडीच तासांचा वेळ दिला आहे जो फार आहे. मात्र त्यानंतर त्यांनी आम्हाला तुम्ही 10 पर्यंत थांबा अशी जबरदस्ती केली. जे चुकीचे आहे.

आम्ही निघाल्यानंतर आमचे फोन किंवा मॅसेज केले नाही. कार्यक्रमाच्या ठिकाणाहून नागपूरला जाण्याची काहीही सोय केली नव्हती. तसेच त्या दिवशी रात्रीच्या पुणे आणि मुंबई फ्लाईट्स नव्हत्या. त्यानंतर आम्हाला त्यांच्या एका नातेवाईकाच्या घरी झोपवलं. फोन मॅसेज केल्यानंतर त्याने उत्तर दिले नाही किंवा ते स्वत:ही आले नाहीत. आम्ही वाद केल्यानंतर त्याने आमचं तिकीट बूक केलं.

तुम्ही जेव्हा एखाद्या कलाकाराला बोलवता तेव्हा त्यांना अशाप्रकारची वागणूक देणं चुकीचं आहे. माझी ही तरतुद आहे की शिवसेनाचा मिथुन खोपडे हा विधानसभेतील लोकसंपर्क अधिकारी आहे. ज्याने आमच्यासोबत हा सर्व प्रकार केला आहे.

माझी विनंती आहे शिवसेनेला की तुम्ही त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना त्या व्यक्तीला हा प्रकार खूप चुकीचा असल्याची जाणीव करुन द्या. एक बाई म्हणून आमची जबाबदारी असते. मात्र ती त्यांनी घेतली नाही. त्यामुळे त्यांनी माझी माफी मागावी.” दरम्यान या सर्व प्रकरणानंतर मिथुन खोपडे यांनी भाग्यश्री मोटेनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.