आमदाराचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’, लवकरच भाजपात प्रवेश!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून भाजपच्या मांडीला मांडी लावून बसणारे शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकर लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. चिखलीकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी सुरु असलेल्या भाजपच्या बैठकीलाही हजेरी लावली. नांदेड महापालिकेत भाजपला मदत केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी चिखलीकरांचे आभारही मानले. आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. भाजपच्या आमदार, खासदार आणि जिल्हाध्यक्ष यांच्या बैठकीत […]

आमदाराचा शिवसेनेला जय महाराष्ट्र, लवकरच भाजपात प्रवेश!
Follow us on

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून भाजपच्या मांडीला मांडी लावून बसणारे शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकर लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. चिखलीकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी सुरु असलेल्या भाजपच्या बैठकीलाही हजेरी लावली. नांदेड महापालिकेत भाजपला मदत केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी चिखलीकरांचे आभारही मानले.

आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. भाजपच्या आमदार, खासदार आणि जिल्हाध्यक्ष यांच्या बैठकीत शिवसेनेचे लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव चिखलीकर यांची उपस्थिती होती. लोहा नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपला यश मिळण्यात चिखलीकर यांची मोठी भूमिका असल्याचं कौतुकही वर्षावर झालेल्या बैठकीत खुद्द मुख्यमंत्री यांनी केलं.

प्रताप पाटील चिखलीकर भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून होती. नांदेड महापालिका निवडणुकीत त्यांनी भाजपच्या व्यासपीठावर उपस्थिती लावत भाजपला मतदान करण्याचं आवाहनही केलं होतं. नांदेड महापालिका निवडणुकीत शिवसेनेला केवळ एकच जागा मिळाली होती.

दरम्यान, या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांनी मनोबल वाढवण्याचाही प्रयत्न केला. काँग्रेसच्या विजयाने खचून जाऊ नका. महाराष्ट्रात नंबर वन भाजप आहे. शिवसेना एकटी लढली तरी आपण समर्थ आहोत. सोबत असेल तर वेल अँड गुड. भाजपच्या बाजूने सकारात्मक चर्चा आहे. मीडियाच्या बातम्या एकूण चर्चा करू नका. मिशन मोडमध्ये आपल्याला जायचंय. केंदीय भाजप अध्यक्ष यांचा रोड मॅप आहे, असं मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितल्याची माहिती आहे.

भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी एक दिवस अगोदरच भाजपची आढावा बैठक घेतली होती. शिवसेनेला सोबत घेण्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः बैठकांचं सत्र सुरु केलंय.