महिला आयोगाच्या आडून भाजप माझ्या अटकेचा खेळ रचतंय : आमदार प्रताप सरनाईक

| Updated on: Sep 05, 2020 | 5:27 PM

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी अभिनेत्री कंगना रनौतच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे (Pratap Sarnaik criticize NCW president ).

महिला आयोगाच्या आडून भाजप माझ्या अटकेचा खेळ रचतंय : आमदार प्रताप सरनाईक
Follow us on

मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी अभिनेत्री कंगना रनौतच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे (Pratap Sarnaik criticize NCW president ). राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्या एका ट्वीटला प्रत्युत्तर देताना त्यांनी शर्मा यांना थेट फटकारलं. आपल्या राजकीय नेत्यांचे प्यादे होऊन त्यांच्या अजेंड्याप्रमाणे वागू नका. आपल्या पदाचा मान राखावा, असा सल्ला प्रताप सरनाईक यांनी रेखा शर्मांना दिला. यावेळी त्यांनी भाजप महिला आयोगाच्या आडून माझ्या अटकेचा खेळ रचत असल्याचा गंभीर आरोपही केला.

प्रताप सरनाईक म्हणाले, “मी माझ्या विधानावर ठाम आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत 106 वीरांनी पत्करलेल्या हौतात्म्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. त्या मराठी माणसांच्या रक्त सांडून मिळवलेल्या मुंबईबद्दल कोणीही काहीही बोललेलं खपवून घेणार नाही. आम्ही महाराष्ट्राचा अभिमान जपण्यासाठी त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊ. भाजपने राष्ट्रीय महिला आयोगाला हाताशी धरुन मला अटक करायचा खेळ रचला आहे. मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मला कितीही वेळा तुरुंगात जावे लागले तरी मी तयार आहे हे लक्षात ठेवा.”


“रेखा शर्मा आपण शेअर केलेला स्क्रिनशॉट खोटा आहे. हा द्वेषपूर्ण खोट्या गोष्टी पसरवण्याचा दुर्दैवी प्रयत्न आहे. आपण भाजपच्यावतीने धार्मिक द्वेष पसवत आहेत. मी यात सांगितल्याप्रमाणे काहीही म्हटलं नाही. त्यामुळे तुम्ही तात्काळ हे ट्वीट डिलीट करावं अशी विनंती. तुम्ही एका महत्त्वाच्या पदावर आहात. त्यामुळे तुम्ही या पदाचा मान राखावा आणि तुमच्या राजकीय नेत्यांच्या अजेंड्यासाठी त्यांचे प्यादे बनू नका,” असं मत प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलं.


महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी एक स्क्रिनशॉट शेअर करत म्हटलं होतं, “एनआयएने दिलेल्या वृत्तानुसार शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगना रनौतला धमकी दिली आहे. त्यांना तात्काळ अटक करावी. मी स्वतः या प्रकरणाची दखल घेत आहे.” या ट्वीटमध्ये रेखा शर्मा यांनी मुंबई पोलीस आयुक्तांनाही टॅग केलं आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर अडवा, कंगनाचा एल्गार, थोबाड फोडणार, शिवसेनेचा पलटवार

कंगनाशी व्यक्तिगत भांडण नाही, महाराष्ट्राचा अपमान करणारा कोणीही असो, आवाज उठवू : संजय राऊत

जे भाजपच्या पोटात ते कंगनाच्या मुखात, महाराष्ट्रद्रोह्यांना छत्रपतींची जनता माफ करणार नाही, बाळासाहेब थोरात भडकले

संबंधित व्हिडीओ :


Pratap Sarnaik criticize NCW president