राम मंदिराच्या ट्रस्टवर शिवसेनेला स्थान द्या, शिवसेना आमदाराचे पंतप्रधानांना पत्र

| Updated on: Mar 07, 2020 | 9:27 AM

"राम मंदिराच्या ट्रस्टवर शिवसेनेला ट्रस्टी म्हणून स्थान द्यावे. एका जागेवर शिवसेनेच्या प्रतिनिधीची निवड करावी", अशी मगणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Shivsena mla demand place on ram mandir trust) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केली आहे.

राम मंदिराच्या ट्रस्टवर शिवसेनेला स्थान द्या, शिवसेना आमदाराचे पंतप्रधानांना पत्र
Follow us on

मुंबई : “राम मंदिराच्या ट्रस्टवर शिवसेनेला ट्रस्टी म्हणून स्थान द्यावे. एका जागेवर शिवसेनेच्या प्रतिनिधीची निवड करावी”, अशी मगणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Shivsena mla demand place on ram mandir trust) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (7 मार्च) अयोध्या दौऱ्यावर जात आहे. तसेच ते आज रामलल्लांचे दर्शन घेणार (Shivsena mla demand place on ram mandir trust) आहेत.

“राम मंदिर आंदोलनात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे योगदान पाहता शिवसेनेला राम मंदिर ट्रस्टमध्ये स्थान द्यावे”, असं सरनाईक यांनी पत्रात लिहिले आहे.

महाराष्ट्रावर सत्ता स्थापन करुन 100 दिवस पूर्ण झाल्यामुळे उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. सहकुटुंब ते तेथे जाऊन रामलल्लांचे दर्शन घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज रामलल्लांचे दर्शन घेतल्यानंतर ते शरयू नदी किनारी होणाऱ्या आरतीमध्ये सहभागी होतील, असं म्हटलं जात आहे.

अयोध्याचे तपस्वी महंत परमहंस दास यांनी काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध दर्शवला केला होता. “उद्धव ठाकरे राम भक्तांना धोका देत आहेत. सत्तेच्या लालसेमुळे त्यांनी काँग्रेससोबत हात मिळवला. उद्धव ठाकरेंना अयोध्येत प्रवेश दिला जाणार नाही. तसेच रामलल्लांचे दर्शनही घेतले जाऊन देणार नाही. मी स्वत: उद्धव ठाकरे यांना रोखणार”, असं महंत परमहंस यांनी सांगितले.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या दोऱ्यापूर्वी मोठ्या संख्येने शिवसैनिक अयोध्या पोहोचले आहेत. विशेष रेल्वे गाडीने शिवसैनिक अयोध्या पोहोचले आहेत. तसेच उत्तरप्रदेशमधील शिवसैनिक अयोध्या पोहचत आहेत.