AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील कोस्टल रोडवरुन ठाकरे बंधू आमने-सामने

मुंबई : राजधानी मुंबईतील कोस्टल रोडवरुन मनसे आणि शिवसेना यांच्यातील राजकारण तापणार याची झलक आज मुंबईत पाहायला मिळाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोळीवाड्यातील मच्छिमारांची भेट घेतली. तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते याच कोस्टल रोडचं आज भूमीपूजन करण्यात आलं. या प्रकल्पामुळे मासेमारी धोक्यात येणार असल्यामुळे कोळी बांधवांचा विरोध आहे. मच्छिमारांनी काही दिवसांपूर्वीच […]

मुंबईतील कोस्टल रोडवरुन ठाकरे बंधू आमने-सामने
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:50 PM
Share

मुंबई : राजधानी मुंबईतील कोस्टल रोडवरुन मनसे आणि शिवसेना यांच्यातील राजकारण तापणार याची झलक आज मुंबईत पाहायला मिळाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोळीवाड्यातील मच्छिमारांची भेट घेतली. तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते याच कोस्टल रोडचं आज भूमीपूजन करण्यात आलं. या प्रकल्पामुळे मासेमारी धोक्यात येणार असल्यामुळे कोळी बांधवांचा विरोध आहे.

मच्छिमारांनी काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंची भेट घेत आपली बाजू मांडली होती. त्यामुळे राज ठाकरेंनी कोळीवाड्यात जाऊन मच्छिमारांची समस्या जाणून घेतली. तर दुसरीकडे हा उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू या प्रकल्पाच्या निमित्ताने आमनेसामने येणार आहेत.

कोस्टल रोड हा प्रिन्सेस स्ट्रीट ते कांदिवली या दरम्यानचा 35.6 किमी लांबीचा मार्ग आहे. समुद्र किनारपट्टीलगत भराव टाकून, पूल आणि बोगदा असा हा मार्ग असेल. या मार्गात प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी फेस या दरम्यान विरोध आहे. कारण, अगोदरच उभा असलेला वरळी सी फेस आणि त्यात कोस्टल रोडचे पिलर यामुळे मासेमारी कठिण होणार असल्याचं कोळी बांधवांचं म्हणणं आहे.

कोस्टल रोडच्या मार्गातून नौकांची ये-जा करण्यासाठी दोन पिलरमधील अंतर कमीत कमी 200 मीटर असावं, समुद्रातील मासेमारीची पारंपारिक जागा मासेमारीसाठीच राखीव ठेवावी, अशी कोळी बांधवांची मागणी आहे. शिवाय माऊंटमेरी ते बाणगंगेपर्यंत गेली अनेक वर्ष कोळी समाजाच्या पारंपारिक मासेमारी पद्धतीच्या जाळ्या विखुरलेल्या आहेत, त्या जागा सुरक्षित राहाव्यात, वादळात लोटस जेट्टी येथे कोळी आपल्या नौका नांगरत असतात, ते बंदर सुरक्षित रहावे, अशीही मागणी आहे. कोस्टल रोडसाठी वरळी ते प्रियदर्शनी पार्कपर्यंत समुद्रात भराव टाकला तर भरतीच्या वेळी समुद्राचं पाणी वरळी कोळीवाड्यात आणि आजूबाजूच्या प्रदेशात शिरण्याची शक्यता असल्याचंही बोललं जातं.

कोस्टल रोडमुळे प्रवासाच्या वेळेत 70 टक्क्यांची बचत होणार आहे. तर 34 टक्के इंधन वाचणार आहे. या प्रकल्पाचा खर्च 12 हजार कोटींपेक्षा अधिक असल्याचंही बोललं जातं.

भूमीपूजन कार्यक्रमावर भाजपचा बहिष्कार

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या कामाचं भूमीपूजन करण्यात आलं. पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण नसल्यामुळे भाजप नेत्यांकडून पोस्टरबाजी करण्यात आली.

Follow Us
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
Rahul Gandhi : माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाणांचंही मोठं विधान, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
NCP Merger : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना...
NCP : सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना दत्तात्रय भरणेंनी दिला पूर्णविराम
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
Raj Thackeray On Chhath Pooja : छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? राज ठाकरेंचा मोठा आरोप
भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा...
Raj Thackeray On BJP : भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा, Gen-Z आंदोलनाचा उल्लेख करत सत्तांतराचे संकेत?
तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला खिंडार; राष्ट्रवादीचा तो नेता..
NCP Politics : सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला मोठा खिंडार; राष्ट्रवादीचा तो नेता शिंदेसेनेत प्रवेश करणार
दिवाळीत महागाईचा डबल झटका, CNG दरात एवढ्या रुपयाची वाढ; वाहनांच्या....
CNG Crisis : दिवाळीत महागाईचा डबल झटका, CNG दरात एवढ्या रुपयाची वाढ; वाहनांच्या लांबच लांब रांगा
पार्थ पवारांनी बोलावली आमदारांची महत्त्वाची बैठक, सुनेत्रा पवारांचीही
NCP Merger : पार्थ पवारांनी बोलावली आमदारांची महत्त्वाची बैठक, सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान पुण्यात राजकीय खलबतं
सुप्रिया ताईंनी विलीनीकरणाच्या खेळावर पडदा टाकलाय; राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : सुप्रिया ताईंनी विलीनीकरणाच्या खेळावर पडदा टाकलाय; संजय राऊतांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
गोकुळ दूध महागणार? खरेदी आणि विक्री दरात प्रत्येकी एवढ्या रुपयांची वाढ
Gokul Milk Price Hike : गोकुळ दूध महागणार? खरेदी आणि विक्री दरात प्रत्येकी एवढ्या रुपयांची वाढ होण्याची शक्यता; ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका