AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माणिकराव ठाकरेंचा पराभव, क्रीडामंत्र्यांना हरवलं, खडसेंविरोधातही पंगा, संजय राठोडांची वादळी कारकीर्द

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडचणीत आलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड आपल्या आमदराकीचा तसंच मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.

माणिकराव ठाकरेंचा पराभव, क्रीडामंत्र्यांना हरवलं, खडसेंविरोधातही पंगा, संजय राठोडांची वादळी कारकीर्द
माणिकरवा ठाकरे, संजय राठोड आणि एकनाथ खडसे
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Feb 28, 2021 | 12:20 PM
Share

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडचणीत आलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) आपल्या आमदराकीचा तसंच मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे जाऊन ते महंतांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते आपला निर्णय जाहीर करतील, अशी माहिती पोहरादेवी येथील महंत जितेंद्र महाराज (Jitendra Maharaj) यांनी दिली आहे. यानंतर आता राठोड यांच्या राजकीय करिअरवर चर्चा झडताना दिसून येत आहेत. (Shivsena Sanjay Rathod political Career)

कोण आहेत संजय राठोड

  • संजय राठोड हे शिवसेनेचे विदर्भातील बडे नेते आहेत
  • शिवसेनेचे नेते संजय राठोड हे पहिल्यांदा 2004 साली यवतमाळमधील दिग्रस विधानसभा मतदार संघातून विजयी झाले.
  • त्यानंतर 2009 आणि 2014 अशा दोन्ही वेळा पुन्हा संजय राठोड आमदार म्हणून विधानसभेत गेले.
  • फडणवीसांच्या 2014 साली राठोड यांच्याकडे यवतमाळच्या सहपालकमंत्रिपदासह महसूल राज्यमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली.
  • 2019 मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा, त्यांच्याकडे वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्रिपदाचा भार सोपवण्यात आला.

काँग्रेसच्या गडावर भगवा फडकवणारे संजय राठोड

संजय राठोड बंजारा समाजातून येतात. शिवसैनिक म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या संजय राठोड यांनी काँग्रेसच्या गडामध्येच कामाला सुरुवात केली. यानंतर त्यांना यवतमाळचं शिवसेना जिल्हाध्यक्ष पदाही मिळालं. 1997 मध्ये वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी ते यवतमाळ शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष झाले. यानंतर त्यांनी झंझावाती पक्ष बांधणी करत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेना रुजवली. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते माणिकराव ठाकरे (ManikRao Thackeray) यांचा दारुण पराभव केला आणि काँग्रेसच्या गडावर भगवा झेंडा फडकावला.

 2004 ला माणिकराव ठाकरेंचा पराभव, 2009 ला विलासरावांच्या मंत्रिमंडळातल्या देशमुखांचा पराभव

2004 मध्ये तत्कालीन गृह राज्यमंत्री असलेल्या माणिकराव ठाकरेंचा पराभव करत ते पहिल्यांदा विधानसभेत पोहचले. 2009 मध्ये दारव्हा मतदारसंघाची पुनर्रचना होऊन दिग्रस मतदार संघ अस्तित्वात आला. या मतदारसंघातून राठोड यांनी विलासरावांच्या मंत्रिमंडळात असलेल्या तत्कालीन क्रीडा मंत्री संजय देशमुख (Sanjay Deshmukh) यांचा पराभव केला. संजय राठोड यांनी 2014 मध्ये आमदारकीची हॅटट्रिक साधली. राष्ट्रवादीचे नेते वसंत घुईखेडकर (Vasant Ghuikhedkar) यांचा त्यांनी पराभव केला.

संजय राठोडांनी 2019 च्या विधानसभेला संजय देशमुखांना दाखवलं आस्मान

2019 मध्ये संजय राठोड यांनी चौकार मारला. भाजपचे बंडखोर उमेदवार संजय देशमुख यांचं तगडं आव्हान त्यांच्यापुढं होतं (अपक्ष म्हणून रिंगणात होते). अशा परिस्थितीतही तब्बल 63 हजार मताधिक्यांनी ते विजयी झाले. त्यामुळे राठोड यांची मंत्रीपदासाठी वर्णी लागली. फडणवीस सरकारमध्ये ते महसूल राज्यमंत्री होते.

एकनाथ खडसेंना थेट आव्हान

राज्यमंत्र्यांना काम करू दिलं जात नाही, असं म्हणत राठोड यांनी तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना थेट आव्हान दिलं होतं. त्यासाठी त्यांनी राजीनाम्याचं अस्त्र वापरलं होतं.

दिग्रस मतदार संघ कायम बंजाराबहुल भाग आहे. बंजारा मतं ही मतदारसंघात निर्णायक समजली जातात. हा वर्ग ज्या उमेदवाराकडे जाईल, त्याचा विजय निश्चित समजला जातो. याचाच फायदा घेऊन या मतदार संघामधली बंजारा मतं संजय राठोड यांनी शिवसेनेच्या बाजूने फिरवली. पुढे बंजारा नेतृत्व म्हणून संजय राठोड यांचं नाव महाराष्ट्रात घेण्यात येऊ लागलं.

हे ही वाचा :

संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यास पुढचे पर्याय काय?; वाचा सविस्तर

Follow Us
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर CM
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर मुख्यंमत्र्यासोबतच्या विमान प्रवासाबाबत दिली मोठी अपडेट
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा निर्णय; पदाधिकाऱ्यांन
Omraje Nimbalkar | इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा डाव; पदाधिकाऱ्यांना...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून... उद्धव ठाकरेंनी सांगितली इनसाईड स्टोरी
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंचे विधान
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो
Supriya Sule | अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फोटो
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये...
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ