AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांना सीबीआयचा दिलासा, 84 कोटींचं फसवणूक प्रकरण, तपास मात्र सुरूच राहणार

Shridhar Patankar :उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना सीबीआयचा दिलासा

उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांना सीबीआयचा दिलासा, 84 कोटींचं फसवणूक प्रकरण, तपास मात्र सुरूच राहणार
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jul 02, 2022 | 9:33 AM
Share

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांना सीबीआयने दिलासा दिला आहे. मात्र या प्रकरणी तपास सुरूच राहणार आहे. कारवाईसाठी सबळ पुरावे उपलब्ध नसल्याचा या प्रकरणी रिपोर्ट सीबीआयकडून कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला. कोर्टानंही तो स्वीकारला आहे. हे 84.6 कोटीच्या कथित घोटाळ्याप्रकरण आहे. या प्रकरणी ईडीनं युनियन बँकेचे अधिकारी, काही ज्वेलर्स आणि पुष्पक बुलियन कंपनीचे संचालक यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर त्याचा तपास सुरू झाला. ईडीनं कारवाई दरम्यान श्रीधर पाटणकर यांची साडेसहा कोटींची मालमत्ता जप्त केली. पण आता पाटणकर यांना या प्रकरणी सीबीआयकडून दिलासा मिळाला आहे.

पाटणकरांना दिलासा

द्धव ठाकरे यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांना सीबीआयने दिलासा दिला आहे. मात्र या प्रकरणी तपास सुरूच राहणार आहे. कारवाईसाठी सबळ पुरावे उपलब्ध नसल्याचा या प्रकरणी रिपोर्ट सीबीआयकडून कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला. कोर्टानंही तो स्वीकारला आहे.

प्रकरण काय आहे?

चंद्रकांत पटेल आणि महेश पटेल यांनी संगनमताने पुष्पक रिएलिटी या पुष्पक ग्रुपमधील कंपनीत तब्बल 20 कोटी रुपये गुंतवल्याचा आरोप आहे. ही रक्कम नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यामार्फत वेगवेगळ्या बोगस कंपन्यांमध्ये गुंतवले असल्याचा आरोप आहे. नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मालकीच्या हमसफर डीलर प्रा. लि. या केवळ कागदोपत्री असलेल्या कंपनीमार्फत श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती या कंपनीला 30 कोटी रुपये बिगर तारण कर्ज दिल्याचं दाखवलं, असा आरोप आहे. पुष्पक ग्रुपच्या महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मदतीने साईबाबा गृहनिर्मिती प्रकल्पात अवैध रक्कम गुंतवल्याचा आरोप ईडीच्या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला होता.

श्रीधर पाटणकर कोण आहेत?

श्रीधर माधव पाटणकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आहेत. रश्मी ठाकरे यांचे ते भाऊ आहेत. श्रीधर पाटणकर हे डोंबिवलीत राहतात. श्रीधर पाटणकर हे उद्योजक आहेत. त्यांचे वडील माधव पाटणकरही उद्योजक होते.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?