AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“एकनाथ शिंदे अज्ञानी, त्यांनी अभ्यास करावा!”, विनायक राऊतांचा सल्ला

:शिवसेना नेते विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. पाहा...

एकनाथ शिंदे अज्ञानी, त्यांनी अभ्यास करावा!, विनायक राऊतांचा सल्ला
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Oct 08, 2022 | 1:39 PM
Share

गिरीश गायकवाड, प्रतिनिधी, मुंबई : शिवसेना नेते विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हासंदर्भात आज निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यावर राऊतांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी शिंदेंवर टीका केलीय. मुख्यमंत्री अज्ञानी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जे सत्य आहे ते निवडणुक आयोगात मांडू, असं राऊत (Vinayak Raut)  म्हणालेत.

आज दुपारी 2 वाजेपर्यंत सगळे पुरावे आम्ही निवडणूक आयोगासमोर ठेवणार आहोत. शिंदे गटाचे सगळे पुरावे तकलादू आहे. बोगस सदस्य नोंदणी आहे. 10 लाख सदस्य नोंदणी केलीय. त्यांची चौकशी व्हावी. मुख्यमंत्री अज्ञानात आहेत. त्यांना अभ्यास करावा लागेल, असं राऊत म्हणालेत.

नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली. त्याबाबत राऊतांना विचारलं असता नारायण राणेंसारख्या तकलादू, स्वार्थी नेत्याबद्दल बोलायचं नाही.ते लाचार आहेत,मी त्यांना काहीही किंमत देत नाही, असं विनायक राऊत म्हणालेत.

राणे दिवसा बोललात की रात्री ते चेक करायला हवं. लाचारीत माझी गणती करू नका. माझं रक्त तुमच्यासारख्या बाडग्यात येणार नाही, असं राऊत म्हणालेत.

धनुष्यबाण चिन्हासाठी ठाकरे विरूद्ध शिंदे अशी लढाई निवडणूक आयोगासमोर होत आहे. निवडणूक आयोगाचे ठाकरे आणि शिंदे गटाला मध्यरात्री ईमेल केला. आज दुपारी दोन वाजेपर्यंत दावे सादर करण्याचे निर्देश दिले. आजचीच डेडलाईन का?, असा सवाल शिवसेनेच्या वकिलांनी पत्राद्वारे निवडणूक आयोगाला केला आहे.यावर बोलताना निवडणूक आयोग कुणाच्या दबावाखाली काम करतंय, असं विनायक राऊत म्हणालेत.

Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...