AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सगळे अधिकार मातोश्रीला द्यायचे का?; शिवसेनेच्या प्रवक्त्याने उद्धव ठाकरे यांना सुनावलं

बोलण्याचा तसेच वागण्याचा देखील तोल गेला. सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग बरखास्त करून यांचे सगळे अधिकार मातोश्रीला द्यायचेत का, असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी उद्धव ठाकरे यांना केला.

सगळे अधिकार मातोश्रीला द्यायचे का?; शिवसेनेच्या प्रवक्त्याने उद्धव ठाकरे यांना सुनावलं
| Updated on: Feb 20, 2023 | 4:33 PM
Share

मुंबई : पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला. सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तिथही निकाल विरोधात गेल्यास सर्वोच्च न्यायालयावरही टीका करालं का, असा सवाल शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी व्यक्त केला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना ते बोलत होते. किरण पावसकर म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांचा तोल जायला लागला. बोलण्याचा तसेच वागण्याचा देखील तोल गेला. सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग बरखास्त करून यांचे सगळे अधिकार मातोश्रीला द्यायचेत का, असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी उद्धव ठाकरे यांना केला.

उद्या सुप्रीम कोर्टाचा निकाल त्यांच्याविरोधात गेला तर सुप्रीम कोर्टाचे अधिकार मातोश्रीला द्यायचेत का? उद्धव ठाकरे यांची बोलण्याची पद्धत ही अतिशय चुकीची आहे. त्यांच्या या वक्तव्याचा मी निषेध करतो, असंही किरण पावसकर म्हणाले.

लाखो लोकांनी पक्षासाठी काम केले

उद्धव ठाकरे यांना भीती आहे की आपल्या सोबतचे आमदार आता जाऊ नये म्हणून ते असं वक्तव्य करतात. अशा वागण्याने जे कोणी आहेत ते देखील त्यांना सोडून जातील. बाळासाहेबांवर प्रेम करून बाळासाहेबांवर विश्वास ठेवून लाखो लोकांनी या पक्षासाठी काम केले. याचा फक्त उद्धव ठाकरे यांचा अधिकार नाही तर या इतर लोकांचा अधिकार आहे, असंही त्यांनी म्हंटलं.

बाळासाहेब तुमच्या एकट्याचे वडील का?

बाळासाहेबांना तुम्ही जर माझे वडील म्हणत असाल तर तुमच्या एकट्याचे वडील नाहीत ते जयदेव, बिंदू माधवांचेदेखील वडील आहेत. त्यामुळे तुमच्या एकट्यांचे वडील बाळासाहेब नाहीत एवढे लक्षात ठेवा. जर वडील चोरीला गेले असतील तर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जा तक्रार करा. जो निर्णय येईल तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. आम्हालाही आणि तुम्हालाही, असंही किरण पावसकर यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावलं.

कोण काय बोलतात याचा विचार करा

महाराष्ट्र शिव संकल्प दौरावर बोलताना किरण पावसकर म्हणाले, त्यांनी नक्कीच फिरायला पाहिजे. त्यांना देखील मुभा आहे. मात्र किती लोक आपल्याकडे आहेत. कोण आपल्याबद्दल काय बोलतात. किती शिल्लक आहेत. ते काय बोलतात, याचा देखील विचार करायला पाहिजे. शिंदे यांनी उठाव केल्यानंतर तुम्ही गाव गाव फिरता खरंतर तुम्ही पहिलेच फिरलं पाहिजे होतं, असा टोलाही उद्धव ठाकरे यांना लगावला.

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.