AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात किस्सा कुर्सी का पेटला, मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर मुलगा.. पहा कोण-काय म्हणालं?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी आज दुपारी एक फोटो ट्विट केला. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे बसलेले दिसतायत. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे पुत्र कारभार चालवतात का, असा प्रश्न यावरून उपस्थित केला जातोय.

महाराष्ट्रात किस्सा कुर्सी का पेटला, मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर मुलगा.. पहा कोण-काय म्हणालं?
मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर खा. श्रीकांत शिंदे हा फोटो राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट केलायImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 23, 2022 | 1:42 PM
Share

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या खुर्चीवर त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) बसल्याचा फोटो व्हायरल झाल्याने चांगलाच वादंग माजलाय.  मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे पुत्र राज्याचा कारभार पाहतात का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलाय. राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे (Ravikant Varpe) यांनी श्रीकांत शिंदे यांचा हा फोटो ट्विट केला. त्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी यावरून सरकारवर हल्लाबोल केलाय.

रविकांत वरपेंचं ट्विट काय?

रविकांत वरपे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, खा. श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दीक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्याचे चिरंजीव कारभार सांभाळतात. हा कोणता राजधर्म? असा कसा हा धर्मवीर?… अशी टीका वरपे यांनी केलीय..

पहा ट्विट-

आदित्य असे वागले नाहीत…

शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनीही हल्ला बोल केलाय. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणं हा अपराध आहे. आदित्य ठाकरे असं कधीही वागले नाहीत… असं वक्तव्य त्यांनी केलंय.

पाहा कायंदे काय म्हणाल्यात?

सचिन खरातांची टीका

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष (खरात) सचिन खरात म्हणाले, राजा का बेटा राजा.. चालणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. आदित्य ठाकरेंना मंत्रिपद मिळाल्यावर यांनीच आक्षेप घेतला होता. आता श्रीकांत शिंदेंच्या या फोटोनंतर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, असं वक्तव्य त्यांनी केलंय.

मुनगंटीवार काय म्हणाले?

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय. ते म्हणाले, ‘ शिवसेनेचा नेता राष्ट्रवादीच्या नेत्यासाठी कशा पद्धतीने धावत गेला, हेही महाराष्ट्राने पाहिलंय. शिवसेना प्रमुख आणि त्यांचे सुपुत्र सोनियांजींच्या समोर किती वाकून अभिवादन होते, हेही पाहिलंय. आता अडीच वर्षात काय केलंय हे सांगण्यासारखं नसल्यानं एखाद्या बैठकीत कुणीही बसलं तर आक्षेपार्ह काहीच नाही… असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.