देवाच्या पैशावर सरकारचा डोळा, मनसेचा आरोप, धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार

| Updated on: Mar 04, 2020 | 7:35 AM

सिद्धीविनायक मंदिर न्यासाने जमवलेले पैसे शिवभोजन आहार योजनेला दिले (siddhivinayak temple donate money for shivbhojan)आहेत. यावरुन शिवसेना आणि मनसे पुन्हा एकदा आमनेसामने आली आहे.

देवाच्या पैशावर सरकारचा डोळा, मनसेचा आरोप, धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार
Follow us on

मुंबई : सिद्धीविनायक मंदिर न्यासाने जमवलेले पैसे शिवभोजन आहार योजनेला दान म्हणून दिले (siddhivinayak temple donate money for shivbhojan)आहेत. यावरुन शिवसेना आणि मनसे पुन्हा एकदा आमनेसामने आली आहे. सरकारचा देवाच्या पैशावर डोळा आहे. हे मनसे होऊ देणार नाही. असा इशारा मनसेनं दिला आहे. तसेच या प्रकरणी मनसेने धर्मादाय आयुक्तांकडे धाव घेतली आहे.

मुंबईतील प्रसिद्ध मंदिर सिद्धीविनायक मंदिर आहे. या मंदिराचे न्यास हे शिवसेनेच्या हाती आहे. या मंदिर न्यासाने राज्य सरकारच्या शिवभोजन योजनेसाठी 5 कोटी रुपये दिले आहेत. याला मनसेने विरोध केला आहे. हे पैसे गरीब नागरिकांसाठी मंदिराच्या ठिकाणी वापरा, अशी सूचना मनसेने केली आहे. तसेच हे पैसे सरकारी यंत्रणेला देता येणार नाही, असा विरोधही मनसेने केला असून याप्रकरणी धर्मादाय आयुक्तांकडे धाव घेतली आहे. याप्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी मनसे नेते संतोष धुरी यांनी केली आहे.

सिद्धीविनायक मंदिरात न्यास लाडू वाटून पैसे जमा करते. एक लाडू 15 ते 20 रुपयाला विकला जातो. हे सामान्य नागरिकांकडून घेतलेले पैसे मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठीच वापरा अशी मागणी मनसेने केली (siddhivinayak temple donate money for shivbhojan) आहे.

या सर्व प्रकरणावर शिवसेनेकडून ही उत्तर देण्यात आलं आहे. टीका करणे हे त्यांचं काम आहे. त्यांना करत राहू द्या, मात्र जनतेने आम्हाला काम करण्याची संधी दिली आहे. ते आम्ही करतच राहणार, अशी प्रतिक्रिया मनसेतून शिवसेनेत गेलेले आमदार दिलीप लांडे यांनी केली आहे.

धर्मादाय आयुक्तांचा पैसा हा जनतेचा पैसा आहे. तो त्यांच्यासाठी वापरला जात आहे, अशी टीकाही दिलीप लांडे यांनी केली आहे.

देशात राज्यात बऱ्याच योजना सरकार आणि खासगी लोक करतात. शिवभोजन थाळीसाठी काही लोक पुढे येत असतील तर त्यात काही गैर नाही. ज्यांना वाटत असेल. प्रसाद वाटावा त्यांनी त्यांच्या घरात प्रसाद तयार करुन वाटावा, अशी बोचरी टीका मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

एकंदरीत शिवभोजन योजनेसाठी शिवसेनेने सिध्दीविनायक न्यासावर आपली सत्ता असल्याने 5 कोटी वळवले आहेत. मात्र या सर्व प्रकरणावर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी बोलण्यास नकार दिला (siddhivinayak temple donate money for shivbhojan) आहे.