शरद पवारांकडून जितेंद्र आव्हाडांचे पुन्हा एकदा तोंडभरुन कौतुक, कारण काय?

| Updated on: Jun 18, 2021 | 10:45 PM

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. या कोविड हेल्थ केअर सेंटरचं लोकार्पण आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं.

शरद पवारांकडून जितेंद्र आव्हाडांचे पुन्हा एकदा तोंडभरुन कौतुक, कारण काय?
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड
Follow us on

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दुसरीकडे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दुभाव कायम आहे. या दोन्ही जिल्ह्यात कोरोना मृत्यूचं प्रमाणही जास्त आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. या कोविड हेल्थ केअर सेंटरचं लोकार्पण आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड आणि उदय सामंत यांचं कौतुक केलं. (Sharad Pawar inaugurates Covid Center in Sindhudurg)

एका मोठ्या संकटाचा सामना आपण सर्वजण करत आहोत. कोरोना हा सिंधुदुर्ग, महाराष्ट्र किंवा देशापुरता मर्यादित असा प्रश्न नाही. संबंध जगावर हे संकट ओढवले आहे. सामूहिक प्रयत्न केले, खबरदारीचे उपाय पाळले तर आपण या संकटावर मात करू शकतो, याचा विश्वास मला स्वतःला आहे. यादृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल राज्य शासनाच्या गृहनिर्माण खात्याचे मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड आणि जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. उदय सामंत यांनी उचलले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविड हेल्थ केअर सेंटरचे लोकार्पण आपण करत आहोत, असं ट्वीट शरद पवार यांनी केलंय.

युद्ध पातळीवर प्रकल्पाची उभारणी

प्रशासन कोणत्या गतीने काम करते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. एक तारखेला प्रस्ताव येतो, दोन तारखेला मान्यता मिळते आणि सुमारे 15 दिवसांच्या आत ऑक्सिजन व इतर सुविधांसहित हे सेंटर उभे राहते. 15 दिवसात हा उपक्रम प्रत्यक्षात आणून नागरिकांना मदत करण्यात गृहनिर्माण विभाग यशस्वी झालेला आहे. राज्यात ज्या ज्या ठिकाणी मदत हवी असेल त्या ठिकाणी मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अशा सुविधा उभारल्या जात आहेत, असंही पवार म्हणाले.

जितेंद्र आव्हाडांचं कौतुक

आधीही नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेत मुंबईतील सर्वात मोठ्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी येणार्‍या रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आठवड्याभराच्या काळात म्हाडाच्या 100 सदनिका उपलब्ध करून दिल्या होत्या. संकटं येतात तेव्हा महाराष्ट्रात दोन गोष्टी पाहायला मिळतात. एक तर यामध्ये कुणी राजकारण आणत नाही आणि दुसरं म्हणजे संकटं आल्यानंतर महाराष्ट्राची प्रशासन यंत्रणा अतिशय मजबुतीने उभी राहते. अतिशय आदर्श अशा पद्धतीने ही यंत्रणा काम करते. आज असंच काम महाराष्ट्रात होत आहे, अशा शब्दात पवार यांनी जितेंद्र आव्हाडांचं कौतुक केलं.

प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रातील लोक, डॉक्टर, नर्सेस यांना सहकार्य करणारे, ऑक्सिजन निर्मिती करणारे लोक यांच्या प्रयत्नांमुळे आपण कोरोनाला हद्दपार करु शकतो. सामुदायिक प्रयत्नातून आपण यश मिळवू अशी खात्री बाळगतो व या कोविड सेंटरचे उद्घाटन झाल्याचे जाहीर करतो, असंही शरद पवार म्हणाले. पवारांनी कौतुक केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनीही ट्वीट करत शरद पवार यांचे आभार मानले आहेत.

संबंधित बातम्या :

थँक्यू आव्हाडसाहेब, टाटा कॅन्सर सेंटरला म्हाडाकडून 100 फ्लॅट्स

हे पहिल्यांदा झालंय, सगळ्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकला : जितेंद्र आव्हाड

Sharad Pawar inaugurates Covid Center in Sindhudurg