एमआयएमची सहावी यादी, सात जिल्ह्यातील उमेदवार जाहीर

सचिन पाटील

सचिन पाटील | Edited By:

Updated on: Sep 30, 2019 | 8:04 PM

बीड शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारही जाहीर करण्यात आलाय. बीडमध्ये एमआयएमच्या उमेदवाराचा सामना युतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर आणि आघाडीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्याशी होईल.

एमआयएमची सहावी यादी, सात जिल्ह्यातील उमेदवार जाहीर

औरंगाबाद : एमआयएमने सहावी यादी जाहीर (Six list of AIMIM candidates) केली आहे, ज्यात सात जिल्ह्यातील सात उमेदवारांचा समावेश आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे यादी (Six list of AIMIM candidates) जाहीर करण्यात आली. यामध्ये बीड शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारही जाहीर करण्यात आलाय. बीडमध्ये एमआयएमच्या उमेदवाराचा सामना युतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर आणि आघाडीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्याशी होईल.

एमआयएमने परभणी, बीड, पैठण (औरंगाबाद), कामटी (नागपूर), हातकणंगले (कोल्हापूर), श्रीरामपूर (अहमदनगर) आणि धुळे या सात जागांसाठी एमआयएमने उमेदवार जाहीर केले.

परभणीतून अली खान मोईन खान, बीडमधून शेख शफीक मोहम्मद, पैठण प्रल्हाद धोंडीराम राठोड, कामटी शकीबुल रहमान, श्रीरामपूर सुरेश जगधाने, हातकणंगले सागर शिंदे आणि धुळ्यातून अन्वर फारुख शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

एमआयएमची पहिली यादी

डॅनियल रमेश लांडगे, वडगाव शेरी, पुणे

मुफ्ती मोहम्मद इस्माईल खलिक, मालेगाव मध्य

मोहम्मद फिरोज खान, नांदेड उत्तर

एमआयएमची दुसरी यादी

शंकर भगवान सलगर, सांगोला, सोलापूर

फारुक मकबूल शब्दी, सोलापूर मध्य

सुफिया तौफिक शेख, सोलापूर दक्षिण

हिना शफिक मोमीन, कॅन्टोनमेंट, पुणे

एमआयएमची तिसरी यादी

रत्नागर ज्ञानू डावरे, कुर्ला

मोहम्मद सालिम कुरेशी, वांद्रे पूर्व

शाहवाज सर्फराज हुस्सैन शेख, अणुशक्तीनगर

वारिस पठाण, भायखळा

आरिफ मौनुद्दीन शेख, अंधेरी पूर्व

एमआयएमची चौथी यादी

इकबाल अहमद खान, जालना

विवेक देविदास ठाकरे, रावेर, जळगाव

मोहम्मद युसूफ अब्दुल हमीद मुल्ला, धुळे

एमआयएमची पाचवी यादी

गफार कादरी, औरंगाबाद पूर्व

नासेर सिद्दीक्की, औरंगाबाद मध्य

अरुण बोर्डे, औरंगाबाद पश्चिम

एमआयएमची सहावी यादी

अली खान मोईन खान,परभणी

शेख शफीक मोहम्मद, बीड

प्रल्हाद धोंडीराम राठोड, पैठण

शकीबुल रहमान, कामटी

सुरेश जगधाने, श्रीरामपूर

सागर शिंदे, हातकणंगले

अन्वर फारुख शिंदे, धुळे

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI