AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SMC Election 2022 Ward 29 : प्रभाग वाढल्याने सोलापूर महापालिका निवडणुकीत अधिक रंगत; प्रभाग क्रमांक 29 मध्ये कुणाची सरशी होणार?

महापालिकेत 2017 च्या निवडणुकीत भाजपची सत्ता होती. आता प्रभाग रचना बदलल्यानं उमेदवारांची संख्याही वाढणार आहे. अशावेळी प्रभाग क्रमांक 29 मधून कोणत्या पक्षाकडून कुणाला संधी मिळणार? आणि कोणता उमेदवार विजयी होणार? याकडे सोलापूरकरांचं लक्ष लागलं आहे.

SMC Election 2022 Ward 29 : प्रभाग वाढल्याने सोलापूर महापालिका निवडणुकीत अधिक रंगत; प्रभाग क्रमांक 29 मध्ये कुणाची सरशी होणार?
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 9:27 AM

सोलापूर : राज्यातील सत्तांतरानंतर आता महापालिका निवडणुकीचे (Municipal Elections) वारे वाहत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यात अनेक ठिकाणी शिवसेना (Shivsena) कमकुवत झालीय. त्याचे पडसाद आगामी महापालिका निवडणुकीवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोलापूर महापालिका निवडणुकीवरही (Solapur Municipal Election) राज्यातील सत्तापालटाचे परिणाम पाहायला मिळू शकतात. सोलापूर महापालिकेत यापूर्वी 26 प्रभाग होते. यंदा मात्र 113 वॉर्ड असून तीन सदस्यीय प्रभाग रचना आहे. त्यामुळे महापालिकेत एकूण 38 प्रभाग आहेत. महापालिकेत 2017 च्या निवडणुकीत भाजपची सत्ता होती. आता प्रभाग रचना बदलल्यानं उमेदवारांची संख्याही वाढणार आहे. अशावेळी प्रभाग क्रमांक 29 मधून कोणत्या पक्षाकडून कुणाला संधी मिळणार? आणि कोणता उमेदवार विजयी होणार? याकडे सोलापूरकरांचं लक्ष लागलं आहे.

प्रभाग क्रमांक 29 चे आरक्षण

सोलापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये वार्ड क्रमांक 29 (अ) मध्ये सर्वसाधारण महिला, वार्ड क्रमांक 29 (ब) मध्ये सर्वसाधारण तर, वार्ड क्रमांक 29 (क) सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे.

प्रभागाची लोकसंख्या किती?

2011 च्या जनगणनेनुसार प्रभाग क्रमांक 29 ची लोकसंख्या 26 हजार 373 इतकी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 1 हजार 457, तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 205 इतकी आहे.

प्रभाग क्र. 29 ची व्याप्ती :

पोलीस हेडक्वॉर्टर, भावनाऋषी हॉस्पीटल, बोल्ली मंगल कार्यालय, मित्रगोत्री पाण्याची टाकी, गॅटचाल टॉकीज, भारतरत्न इंदिरा नगर झोपडपट्टी भाग, लोकसेवा हायस्कूल व परिसर.

उत्तर : पोलीस हेडक्वॉर्टरच्या उत्तरपश्चिम कोपऱ्यापासून पूर्वेकडे रस्त्याने १९८६ न्यु पाच्छा पेठ हेल्थ क्लिनीकच्या उत्तरपश्चिम कोपऱ्यापर्यंत. तेथून दक्षिणेकडे व पूढे पूर्वेकडे व पूढे उत्तरेकडे श्री मल्लिकार्जून कमटम यांच्या घराच्या उत्तरपश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पूर्वेकडे मुख्य रस्त्याने W.I.T. कॉलेजच्या वसतीगृहाच्या दक्षिणपश्चिम कोपऱ्यापर्यंत.

पूर्व : W.I.T. कॉलेजच्या वसतीगृहाच्या दक्षिणपश्चिम कोपऱ्यापासून दक्षिणेकडे रस्त्याने बोल्ली मंगल कार्यालयाच्या उत्तरपश्चिम कोपऱ्यापर्यंत. तेथून पूर्वेकडे रस्त्याने साईबाबा चौकापर्यंत. तेथून पूढे दक्षिणेकडे मुख्य रस्त्याने भारतरत्न इंदिरा नगर येथील शिंदे क्लिनीकच्या उत्तरपूर्व कोपऱ्यापर्यंत.

दक्षिण : भारतरत्न इंदिरा नगर येथील शिंदे क्लिनीकच्या उत्तरपूर्व कोपऱ्यापासून पश्चिमेकडे घ. नं. – १९७ नजिर बागवान यांच्या घराच्या उत्तरपश्चिम कोपऱ्यापर्यंत. तेथून दक्षिणेकडे घ. नं. – २०६ ए सादिक देवनी यांच्या घराच्या दक्षिणपश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे रस्त्याने शासकीय क्रिडा संकुलाच्या उत्तरपश्चिम कोपऱ्यापर्यंत म्हणजेच ७० फुट रिंगरोड पर्यंत.

पश्चिम : शासकीय क्रिडा संकुलाच्या उत्तरपश्चिम कोपऱ्यापासून उत्तरेकडे ७० फुट रिंगरोडने संत तुकाराम चौकापर्यंत. तेथून पुढे वायव्येकडे मुख्य रस्त्याने पाथरुट चौक मारुती मंदिरापर्यंत. तेथून पुढे उत्तरेकडे पोलीस हेडक्वॉर्टरच्या उत्तरपश्चिम कोपऱ्यापर्यंत.

पक्ष उमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

विमान दुर्घटनेतल्या वस्तीगृहातल्या विद्यार्थ्यांनी सांगितली आँखों देखी
विमान दुर्घटनेतल्या वस्तीगृहातल्या विद्यार्थ्यांनी सांगितली आँखों देखी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मृतांच्या नातेवाईकांना भेटले
पंतप्रधान नरेंद्र मोदी मृतांच्या नातेवाईकांना भेटले.
मृतांच्या 192 नातेवाईकांच्या DNA चाचण्या पूर्ण
मृतांच्या 192 नातेवाईकांच्या DNA चाचण्या पूर्ण.
लकी नंबरनेच केला रुपाणींचा घात, त्याच तारखेला मृत्यूने कवटाळलं
लकी नंबरनेच केला रुपाणींचा घात, त्याच तारखेला मृत्यूने कवटाळलं.
अहमदाबाद विमान दुर्घटनेवर राज ठाकरेंनी उपस्थित केले मोठे प्रश्न..
अहमदाबाद विमान दुर्घटनेवर राज ठाकरेंनी उपस्थित केले मोठे प्रश्न...
टेकऑफ नंतर काही क्षणात विमान मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळलं अन्...
टेकऑफ नंतर काही क्षणात विमान मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळलं अन्....
विमान क्रॅश होणार हे आधीच कळलं?, 'त्या' प्रवाशानं काय केलं होतं ट्विट?
विमान क्रॅश होणार हे आधीच कळलं?, 'त्या' प्रवाशानं काय केलं होतं ट्विट?.
लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील सर्वच 242 जणांचा मृत्यू - AP
लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील सर्वच 242 जणांचा मृत्यू - AP.
242 प्रवाशी असलेलं प्लेन अहमदाबादेत क्रॅश, आतापर्यंत काय-काय घडलं?
242 प्रवाशी असलेलं प्लेन अहमदाबादेत क्रॅश, आतापर्यंत काय-काय घडलं?.
क्षणभर तुम्हीही सुन्न व्हाल...कसा झाला अहमदाबाद विमान अपघात? बघा VIDEO
क्षणभर तुम्हीही सुन्न व्हाल...कसा झाला अहमदाबाद विमान अपघात? बघा VIDEO.