भाजप कार्यकर्त्याची हत्या, पार्थिवाला स्मृती इराणींचा खांदा

लखनौ : उत्तर प्रदेशमधील अमेठी येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर उत्तर प्रदेशमधील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी स्वतः मृत सुरेंद्र सिंहच्या घरी पोहचल्या. यावेळी त्यांनी सुरेंद्र यांच्या मृतदेहाला अंतिम संस्कार देताना खांदा दिला. इराणी यांनी मृत सुरेंद्र यांच्या कुटुंबीयांचे सांत्वनही केले. स्मृती इराणी म्हणाल्या, “पीडित कुटुंबाला न्याय मिळेल. हत्या करणाऱ्या दोषींवर कठोर …

भाजप कार्यकर्त्याची हत्या, पार्थिवाला स्मृती इराणींचा खांदा

लखनौ : उत्तर प्रदेशमधील अमेठी येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर उत्तर प्रदेशमधील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी स्वतः मृत सुरेंद्र सिंहच्या घरी पोहचल्या. यावेळी त्यांनी सुरेंद्र यांच्या मृतदेहाला अंतिम संस्कार देताना खांदा दिला. इराणी यांनी मृत सुरेंद्र यांच्या कुटुंबीयांचे सांत्वनही केले.

स्मृती इराणी म्हणाल्या, “पीडित कुटुंबाला न्याय मिळेल. हत्या करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे आणि लवकरच दोषी पकडले जातील.”

उत्तर प्रदेशचे पोलीस उपमहानिरीक्षक ओ. पी. सिंह म्हणाले, “आम्हाला हत्येशी संबंधित प्रमुख पुरावे मिळाले आहेत. 7 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील 12 तासात दोषी पकडले जातील असा आम्हाला विश्वास आहे. कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न नाही.”

सुरेंद्र सिंह कोण?

सुरेंद्र सिंह हे अमेठीतील बरौलिया गावाचे प्रमुख आहेत. सुरेंद्र यांची ओळख भाजपचे कार्यकर्ते म्हणूनही केली जाते. विशेष म्हणजे भाजप नेत्या भाजपाच्या नेत्या स्मृती इराणी यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणूनही त्यांची ओळख आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत अमेठीतून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींचा पराभव होण्यामागे सुरेंद्र सिहं यांचा सहभाग होता.

संबंधित बातम्या:

भाजपच्या विजयाचा जल्लोष केल्याने कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *