एस.टी.कर्मचाऱ्यांचा संप चिघळतोय, फडणवीसांनी सरकारला मार्ग सांगितला? सरकार करणार का?

| Updated on: Nov 10, 2021 | 4:22 PM

राज्य सरकारनं तात्काळ चर्चा करुन यावर तोगडा काढायला हवा. आम्ही सरकारला पूर्ण सहकार्य करायला तयार. आमचे आमदार गोपीचंद पडळकर, इतर सर्व आमदार, सदाभाऊ खोत आंदोलनात आहेत. सरकारनं संवेदनशीलता दाखवावी', असं आवाहन फडणवीस यांनी ठाकरे सरकारला केलंय.

एस.टी.कर्मचाऱ्यांचा संप चिघळतोय, फडणवीसांनी सरकारला मार्ग सांगितला? सरकार करणार का?
देवेंद्र फडणवीस, अनिल परब
Follow us on

मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याच्या मार्गावर आहे. मुंबईतील आझाद मैदानात राज्यभरातील एसटी कर्मचारी जमायला सुरुवात झालीय. यावेळी भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनिल परब आणि ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ठाकरे सरकारला लक्ष करत एसटी कर्मचारी संपावर तोडगा काढण्याबाबत सल्लाही दिला आहे. (Devendra Fadnavis appeals to resolve the strike of ST workers sensitively)

‘एसटी संपाबाबत सरकारची भूमिका असंवेदनशील. संप चिघळू नये असं आम्हाला वाटतं पण सरकार दमनशाहीचा वापर करत आहे. हे आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न होत असेल तर ते अजून वाढेल. चर्चेतून मार्ग काढला पाहिजे. कर्मचाऱ्यांना दिलासा द्यायला हवा. राज्य सरकारनं तात्काळ चर्चा करुन यावर तोगडा काढायला हवा. आम्ही सरकारला पूर्ण सहकार्य करायला तयार. आमचे आमदार गोपीचंद पडळकर, इतर सर्व आमदार, सदाभाऊ खोत आंदोलनात आहेत. सरकारनं संवेदनशीलता दाखवावी’, असं आवाहन फडणवीस यांनी ठाकरे सरकारला केलंय.

जर दिवाळी गोडी केली तर आत्महत्या का झाल्या? – पडळकर

राज्य सरकार म्हणतं एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली. जर दिवाळी गोड केली तर आत्महत्या का झाल्या? असा सवाल पडळकर यांनी केलाय. 35 कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या आहेत. हे तुमचं आंदोलन आहे, पण जबाबदारी आमची आहे. माणुसकीच्या हेतुनं आम्ही तुमच्यासोबत आहेत. सरकारकडे खायला पैसे आहेत, गरीबांना द्यायला नाहीत. त्यामुळे आता मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार नाही, अशी घोषणाच पडळकर यांनी केलीय. आम्ही तुमच्यासोबत इथेच झोपणार. बायका-मुलांना बोलावून घ्या. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, असा इशारा पडळकर यांनी दिलाय.

दरेकरांची अनिल परबांवर टीका

किरीट सोमय्यांमुळे अनिल परब पळून जायला नकोत. परब पळून गेले तर आम्हाला न्याय कोण देणार? असा खोचक सवाल करत दरेकर यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केलीय. सर्व एसटी कर्मचारी संघटनांना आवाहन आहे, तुमच्याकडे मोर्चा वळवायला लावू नका. कर्मचाऱ्यांच्या जीवावर तुम्ही मोठे झाले आहात. आता कर्मचाऱ्यांचा विचार करा. तुम्ही एसीत बसा पण आम्हाला एसटी कर्मचाऱ्यांना बसायला तरी व्यवस्थित जागा द्या, अशी खोचक टीकाही दरेकर यांनी केलीय. त्याचबरोबर मंत्रालयात बसलेल्यांना अजूनही जाग येत नाही. एसटी कर्मचाऱ्यांसाठी 100 वेळा उंबरठे झिजवायला तयार आहे. न्याय मिळवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही दरेकर यांनी यावेळी दिलाय.

इतर बातम्या :

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक, 14 ते 19 नोव्हेंबरदरम्यान राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा

किरीट सोमय्यांमुळे अनिल परब पळून गेले तर आम्हाला न्याय कोण देणार? प्रवीण दरेकरांची घणाघाती टीका

Devendra Fadnavis appeals to resolve the strike of ST workers sensitively