AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुजात आंबेडकर यांच्या गाडीला अपघात

वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar accident) यांच्या गाडीला अपघात झाला आहे.

सुजात आंबेडकर यांच्या गाडीला अपघात
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Oct 16, 2019 | 4:12 PM
Share

नांदेड:  वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar accident) यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मराठवाडा दौऱ्यात सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar accident)  यांच्या वाहनाला अपघात झाला. सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या अपघातात सुजात यांना किरकोळ दुखापत झाली.

याबाबत सुजात आंबेडकर यांनी व्हिडीओ पोस्ट करुन आपण सुखरुप असल्याचं म्हटलं आहे.

“मी सुजात आंबेडकर. सोमवारी रात्री माझा छोटासा अपघात झाला होता. मी आता ठीक आहे. आजचा (15 ऑक्टोबर) नांदेड येथील माझा नियोजित दौरा मी करणार आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. जमतील तितके दौरे करेन. पण शक्य झालं नाही, तर माफ करा आणि वंचितचं काम सुरु ठेवा” असं सुजात आंबेडकर यांनी म्हटलं.

सध्या निवडणुकांची धामधूम सुरु आहे. सर्वच राजकीय पक्ष प्रचारात व्यस्त आहेत. राजकीय नेत्यांना राज्यभर दौरे करताना, सभास्थळ गाठण्यासाठी दिवसभर, रात्री-अपरात्री प्रवास करावा लागतो. सभास्थळ गाठणं, प्रचारवेळ सांभाळणे, प्रवास हे सर्व करताना नेत्यांना मोठी कसरत करावी लागते.

सुजात आंबेडकर कोण आहे? 

  • सुजात आंबेडकर प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा आहे.
  • 24 वर्षीय सुजात एक उत्तम ड्रमर आहे.
  • सुजातने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून राज्यशास्त्राची पदवी मिळवली आहे.
  • 2016 ते 2018 दरम्यान चेन्नईच्या नामांकित एशियन कॉलेज ऑफ जर्नालिझम महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले.
  • सध्या तो वंचित बहुजन आघाडीच्या युवाफळीचं काम पाहतो आहे.
  • लोकसभा निवडणुकी वंचित आघाडीच्या सोशल मीडिया सांभाळण्याची धुरा सुजातवर होती.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...