AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Sule Video : ‘घाणेरडं राजकारण थांबायला हवं, पुढाकार घ्यायला तयार’, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; अ‍ॅक्टिंग करत फडणवीसांनाही टोला

सुप्रिया सुळे यांनी जळगावात बोलताना महत्वाचं वक्तव्य केलंय. घाणेरड्या पद्धतीचं राजकारण कुठेतरी थांबायला हवं. त्याबाबकत सर्वपक्षीय नेत्यांशी बोलायला आपण पुढाकार घ्यायला तयार असल्याचंही सुळे यावेळी म्हणाल्या.

Supriya Sule Video : 'घाणेरडं राजकारण थांबायला हवं, पुढाकार घ्यायला तयार', सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; अ‍ॅक्टिंग करत फडणवीसांनाही टोला
सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसImage Credit source: TV9
| Edited By: sagar joshi | Updated on: May 17, 2022 | 9:23 PM
Share

जळगाव : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या पुण्यातील कार्यक्रमात सोमवारी मोठा राडा पाहायला मिळाला. इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी इराणी यांच्याविरोधात जोरदार आंदोलन आणि घोषणाबाजी केली. इतकंच नाही तर बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमातही राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी (NCP Woman Activist) गोंधळ घातला. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांना मारहाण झाल्याचा आरोपही करण्यात येतोय. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. दुसरीकडे केतकी चितळे  प्रकरणही चांगलंच गाजत आहे. अशावेळी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी जळगावात बोलताना महत्वाचं वक्तव्य केलंय. घाणेरड्या पद्धतीचं राजकारण कुठेतरी थांबायला हवं. त्याबाबकत सर्वपक्षीय नेत्यांशी बोलायला आपण पुढाकार घ्यायला तयार असल्याचंही सुळे यावेळी म्हणाल्या.

‘घाणेरडं राजकारण कुठेतरी थांबायला हवं’

सुप्रिया सुळे म्हणाल्या की राज्यात केतकी चितळे असो की नवनीत राणा यांच्यासह विविध विषयावरुन राजकारण सुरु आहे. हे कुठेतरी थांबली पाहिजे. अतिशय घाणेरड्या पद्धतीचं राजकारण सुरु आहे. हे सर्व थांबायला हवं. त्यासाठी मी स्वत: पुढाकार घेईन. भाजप नेते, मनसेचे राज ठाकरे असो की महाविकास आघाडीतील सर्व पक्षांमधील मध्यस्थी करेन, मी सर्व पक्षांसोबत बोलायला तयार आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.

भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेवरही अंडी फेकली, शाई फेक करण्यात आली. त्याबाबत विचारलं असता अशा प्रकारची पोस्ट करणं किंवा बोलणं अत्यंत वाईट आहे. यावर उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासब विविध पक्षांच्या नेत्यांनी निषेध नोंदवला. त्यांचे मी आभारही मानले. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यासाठी मी पुढाकार घ्यायला तयार आहे, सर्व पक्षातील नेत्यांशीही चर्चा करेल, असंही त्यांनी सांगितलं.

सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला, अ‍ॅक्टिंगही केली!

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारच्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. अयोध्या आणि बाबरीच्या मुद्द्यावरुन त्यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला होता. उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देताना महाविकास आघाडी सरकारचा बाबरी ढाचा पाडणार, असा इशाराच फडणवीस यांनी दिला. त्याबाबत विचारलं असता सुप्रिया सुळे यांनी घाबरण्याची अ‍ॅक्टिंग करत मला खूप भीती वाटते, अशी खोचक टिप्पणी केली.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?