‘लाव रे तो व्हिडिओ हा त्यांचा उर्मटपणा’, सुषमा अंधारे यांचा राज ठाकरे यांना टोला

| Updated on: Nov 15, 2022 | 10:16 PM

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावलाय.

लाव रे तो व्हिडिओ हा त्यांचा उर्मटपणा, सुषमा अंधारे यांचा राज ठाकरे यांना टोला
Follow us on

कोल्हापूर : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावलाय. सुषमा अंधारे यांची प्रबोधनयात्रा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते धैर्यशील माने यांच्या कोल्हापुरातील मतदारसंघात पोहोचली. यावेळी त्यांनी व्हिडीओ लाऊन भाषणाला सुरुवात केली. पण याचवेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला. “लाव रे तो व्हिडिओ हा त्यांचा उर्मटपणा. आपण दादा व्हिडिओ लाव म्हणू”, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.

सुषमा अंधारे यांनी यावेळी भाजपवर देखील टीका केली. “भाजपने द्वेषमाचं राजकारण सुरू केलंय. ते राजकारण थांबलं पाहिजे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वेषाचं राजकारण थांबलं पाहिजे असं केवळ म्हणतात. पण त्यासाठी काही न करता ते वाढवण्यासाठी त्यांनी अमराठी टीम तयार केली आहे. किरीट सोमय्या, राणा दाम्पत्य असे अनेक लोकं फडणवीसांनी उभी केली आहेत”, असा घणाघात सुषमा अंधारे यांनी केला.

“बाजू व्हा म्हटलं की लगेच विनयभंगाचा गुन्हा दाखल केला जातो”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांच्यावरही खोचक टीका केली. “गोड बोल्या आणि साखर झेल्या म्हणजे दीपक केसरकर होय. केसरकर म्हणतात उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं”, अशी टीका त्यांनी केली.

सुषमा अंधारे काय-काय म्हणाल्या?

“उत्तर प्रदेशात गंगेत वाहून गेलेले मृतदेह तुम्हाला दिसत नाहीत का?”

“एक भगिनी खासदार राहुल शेवाळे यांच्याबरोबरचा व्हिडीओ रिलीज करते. माझ्या जीवाला धोका आहे, असं म्हणते पण त्यावर कारवाई करायची फडणवीस यांची हिम्मत नाही. नारायण राणे यांच्या दोन बारक्या पोरांवर मी बोलणार नाही. विचारानं बारके असलेली ही पोरं कोणत्याही भाषेत बोलतात पण फडणवीस काही करत नाहीत”.

“गुलाबराब बावचळलेलं आहे त्यांच्यावर मी काही बोलत नाही. त्यानंतर अब्दुल सत्तार महिलांच्या बाबतीत काहीही बोलतात पण त्यांच्यावर कारवाई फडणवीस करत नाहीत’.

“एकनाथ शिंदे केवळ बाहुले आहेत. फडणवीस सांगतील ते करतात. ते बोल म्हटले की बोलतात. चाल म्हटलं की चालतात. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान नाही. यावरून ते महिलांचा किती आदर करतात ते कळतं”.

“विजय बापू म्हणाले खोक्यावर बोलायचे नाही. आम्ही खोक्याबद्दल बोलायचे नाही, खोके गुवाहटीला गेले नव्हते”.

“तुम्ही आरे म्हटलं की आम्ही कारे म्हणणार. का रे म्हणणार नाही तर ते शिवसैनिक कसले?”

“निवडणूक आयोग आणि यांचे लागेबांधे होते. निकाल लागण्याआधीच यांनी तलवार लॉन्च केली. त्यांनी फक्त पक्षाचा आणि पक्षप्रमुखांचा विश्वासघात केला नाही, तर चिन्हाचा आणि चिन्हाला मतदान देणाऱ्या मतदारांचाही विश्वासघात केला”:

“धैर्यशील माने यांचा गट 2019 च्या आधी कुठल्या अडगळीत पडला होता? धैर्यशील मानेंचा इतिहास बघितला तर ते विश्वासघात करण्यात पटाईत आहेत. कर्तृत्व नसताना, विश्वासघाताचा इतिहास असताना मानेंना उमेदवारी दिली. एकदा यांना इंगा दाखवलाच पाहिजे”