
मुंबई, दि. 10 जानेवारी 2024 | शिवसेना आमदारांसाठी बुधवारचा दिवस महत्वाचा आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल देणार आहे. घटनेच्या दहाव्या परिशिष्टानुसार हा निकाल होणार आहे. यामुळे घटनेच्या दहाव्या परिशिष्टाची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. भारतीय घटनेत दहाव्या सूचित पक्षांतर बंदी कायद्याचा उल्लेख आहे. हे दहावे परिशिष्ट 1985 मध्ये 52 व्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आले. त्यामध्ये पक्ष बदल करणाऱ्या सदस्यांना अपात्र ठरविणे आणि पक्षांतर बंदी काय आहे, याचा उल्लेख आहे. राजकीय लाभ किंवा पदासाठी पक्षांतर करणाऱ्या लोकप्रतिनिधीला अपात्र करण्याचा अधिकार आहे. आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांना दिला आहे. परंतु अध्यक्षांच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची तरतूद आहे.
पक्षांतर बंदी कायद्याच्या दहाव्या परिशिष्टामध्ये काही अपवाद दिले आहे. त्यानुसार दोन तृतीयांश आमदार किंवा खासदार दुसऱ्या पक्षात गेले तर त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही. परंतु शिवसेनेच्या प्रकरणात एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले ४० आमदार एकत्र गेले नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष याचा कसा अर्थ लावणार ? हे निकालात स्पष्ट होईल.
पक्षांतर बंदी कायद्याबाबत आया राम गया राम हा एक वाक्प्रचार तयार झाला. हा कसा तयार झाला याची सत्यघटना आहे. भारतीय राजकारणात परिणाम करणारी ही घटना ठरली. 1967 मध्ये हरियाणाचे आमदार गयालाल यांनी एकाच दिवसात तीनदा पक्ष बदलला. त्यानंतर पक्षांतरबंदी कायद्याची मागणी झाली. त्यांच्या नावावरुन आया राम गया राम झाला.