दहशतवाद म्हणजे त्याग, तपस्या आणि बलिदानाचे प्रतिक : मध्य प्रदेश भाजप अध्यक्ष

| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

भोपाळ : देशभरात लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते सभा आणि रॅली करत आहेत. मात्र या सभांमध्ये बोलताना अनेत नेत्यांचा तोल सुटताना किंवा जीभ घसरताना पाहायला मिळते. मध्य प्रदेश भाजपचे अध्यक्ष राकेश सिंह यांनीही अशाच प्रकारे वक्तव्य केले आहे. त्यांनी दहशतवाद म्हणजे त्याग, तपस्या आणि बलिदानाचे प्रतिक असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. ते बुधवारी […]

दहशतवाद म्हणजे त्याग, तपस्या आणि बलिदानाचे प्रतिक : मध्य प्रदेश भाजप अध्यक्ष
Follow us on

भोपाळ : देशभरात लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते सभा आणि रॅली करत आहेत. मात्र या सभांमध्ये बोलताना अनेत नेत्यांचा तोल सुटताना किंवा जीभ घसरताना पाहायला मिळते. मध्य प्रदेश भाजपचे अध्यक्ष राकेश सिंह यांनीही अशाच प्रकारे वक्तव्य केले आहे. त्यांनी दहशतवाद म्हणजे त्याग, तपस्या आणि बलिदानाचे प्रतिक असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. ते बुधवारी एका प्रचारसभेत बोलत होते.

राकेश सिंह भगवा या शब्दाचे महत्व सांगताना बोलत होते. यावेळी ते म्हणाले, ‘भगवा कधीही दहशतवादी असू शकत नाही. भगवा घालणारा कधीही दहशतवादी असू शकत नाही. दहशतवाद तर त्याग, तपस्या आणि बलिदानाचे प्रतीक आहे.’ सभेत बोलताना सिंह यांची जीभ घसरली. भगव्यावर बोलता बोलता त्यांनी भगवा शब्दाऐवजी थेट दहशतवाद या शब्दाचा उपयोग केला आणि दहशतवादाचेच कौतुक करायला सुरुवात केली.

यावेळ बोलताना सिंह यांनी भोपाळ लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार असलेल्या दिग्विजय सिंह यांनाही लक्ष्य केले. जेव्हा निवडणूक येते त्यावेळी दिग्विजय सिंह आणि काँग्रेसचे तर नेते भगव्यावर डोके टेकवताना दिसतात, अशी टीका सिंह यांनी केली. भोपाळमधून दिग्विजय सिंह यांच्याविरोधात भाजपने प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. मध्य प्रदेश भाजप प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह स्वतः जबलपूर येथून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.