एकनाथ शिंदेंच्या आरोग्यासाठी ठाण्यात शिवसैनिकांचे होमहवन

| Updated on: Sep 25, 2020 | 5:47 PM

एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत सुधार व्हावा, यासाठी शिवसैनिकांनी ठाण्यातील घोडबंदर भागात एकत्र येऊन होम हवन आयोजित केला होता

एकनाथ शिंदेंच्या आरोग्यासाठी ठाण्यात शिवसैनिकांचे होमहवन
Follow us on

ठाणे : शिवसेनेचे दिग्गज नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सांभाळणाऱ्या शिंदेंसाठी ठाण्यात शिवसैनिकांनी होम हवनाचे आयोजन केले. (Thane Shivsainiks prayer for Shivsena Minister Eknath Shinde’s health after Corona infection)

एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत सुधार व्हावा, यासाठी शिवसैनिकांनी ठाण्यातील घोडबंदर भागात एकत्र येऊन होम हवन आयोजित केला होता. एकनाथ शिंदे यांचे आरोग्य सुदृढ व्हावे यासाठी सर्वांनी एक लाख वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याचे नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी स्वत: ट्विट करुन आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती काल दिली होती. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षणं जाणवू लागल्याने कोरोनाची टेस्ट केली होती. त्याचा अहवाल काल पॉझिटिव्ह आला. “माझी प्रकृती ठीक आहे. काळजी करु नका. परंतु, माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची कोव्हिड चाचणी करुन घ्यावी आणि खबरदारी घ्यावी” असं आवाहन शिंदे यांनी ट्विटरवरुन केलं.

“एकनाथ शिंदेंजी काळजी घ्या, गेले सहा महिने कोरोनाविरुद्धचा लढा आपण देखील फ्रंटलाईन वरूनच लढत आहात. आपण लवकर बरे होऊन महाराष्ट्राच्या सेवेत रुजू व्हाल ही मला खात्री आहेच, पण पूर्ण बरे होईपर्यंत आराम करा!”असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले.

कोरोनाची लागण झालेले ठाकरे सरकारमधील मंत्री

कॅबिनेट मंत्री

1. जितेंद्र आव्हाड – गृहनिर्माण मंत्री (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : एप्रिल 2020 – कोरोनामुक्त 
2. अशोक चव्हाण – सार्वजनिक बांधकाम मंत्री (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 25 मे 2020 – कोरोनामुक्त
3. धनंजय मुंडे – सामाजिक न्याय मंत्री (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : 12 जून 2020 – कोरोनामुक्त
4. अस्लम शेख – वस्त्रोद्योग मंत्री (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 20 जुलै 2020 – कोरोनामुक्त
5. बाळासाहेब पाटील – सहकार मंत्री (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : 15 ऑगस्ट 2020 – कोरोनामुक्त
6. सुनील केदार – दुग्धविकास मंत्री (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 3 सप्टेंबर 2020 – कोरोनामुक्त
7. नितीन राऊत – ऊर्जा मंत्री (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 18 सप्टेंबर 2020
8. हसन मुश्रीफ – ग्रामविकास मंत्री (राष्ट्रवादी) – 18 सप्टेंबर 2020
9. वर्षा गायकवाड – शालेय शिक्षण मंत्री (काँग्रेस) – 23 सप्टेंबर 2020
10. एकनाथ शिंदे – नगरविकास मंत्री (शिवसेना) – 24 सप्टेंबर 2020

राज्यमंत्री

1. अब्दुल सत्तार – महसूल (शिवसेना) – कोरोनाची लागण : 22 जुलै 2020 – कोरोनामुक्त
2. संजय बनसोडे – पर्यावरण, रोहयो (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : 2020 – कोरोनामुक्त
3. प्राजक्त तनपुरे – नगरविकास, ऊर्जा (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : 7 सप्टेंबर 2020 – कोरोनामुक्त
4. विश्वजीत कदम – सहकार, कृषी (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 11 सप्टेंबर 2020
5. बच्चू कडूशालेय शिक्षण (अपक्ष) – कोरोनाची लागण : 19 सप्टेंबर 2020

 संबंधित बातम्या : 

Eknath Shinde | पीपीई कि्टस घालून रुग्णालयांची पाहणी, एकनाथ शिंदेंना करोना

एकनाथ शिंदेंना कोरोना, आदित्य ठाकरेंनी दिला ‘हा’ सल्ला

(Thane Shivsainiks prayer for Shivsena Minister Eknath Shinde’s health after Corona infection)