Maharashtra Assembly Session 2022: 12 आमदारांच्या अनुपस्थितीमध्ये विधानसभा अध्यक्षांची निवड, सर्वाधिक राष्ट्रवादीच्या आमदारांची दांडी

विधानसभा अध्यक्षांच्या निवडीच्या दरम्यान जवळपास डझनभर आमदार हे उपस्थितच राहिले नाही. राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आजारी किंवा परदेशात असणाऱ्या आमदारांनीही हजेरी लावली होती पण अध्यक्षपदाच्या निवडी दरम्यान 12 आमदार उपस्थित राहू शकले नाहीत. यामध्ये सर्वाधिक 7 आमदार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे होते.

Maharashtra Assembly Session 2022: 12 आमदारांच्या अनुपस्थितीमध्ये विधानसभा अध्यक्षांची निवड, सर्वाधिक राष्ट्रवादीच्या आमदारांची दांडी
राष्ट्रवादीचे निलेश लंके, संजय बनसोडे आणि बबन शिंदे हे आमदार अनुपस्थित होते.
राजेंद्र खराडे

|

Jul 03, 2022 | 2:31 PM

मुंबई : कधीकाळी विरोधी पक्षातील नेत्याच्याही (Assembly Speaker) विधानसभा अध्यक्षपदी निवड केली जात होती. पण आता बदलत्या राजकीय परस्थितीनुसार ही निवड देखील प्रतिष्ठेची होऊ लागली आहे. सत्तेची समीकरणे बदलल्यानंतर याचा अनुभव सर्व महाराष्ट्राला आला आहे. असे असतानाही रविवारी झालेल्या निवडीच्या दरम्यान 12 आमदारांची अनुपस्थिती होती. यामध्ये सर्वाधिक संख्या ही (Rashtrawadi Party) राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या आमदारांची आहे. तर भाजपाचे लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक ह्या आजारी असल्याने उपस्थित राहू शकल्या नाहीत. तर शिंदे गटाचे आणि शिवसेनेच्या सर्व आमदारांनी या अध्यक्षपदाच्या निवडीला हजेरी लावली होती. अध्यक्ष पदासाठी भाजपाकडून राहुल नार्वेकर आणि महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. निवडीचे चित्र स्पष्ट असल्याने अनेकजण अनुपस्थित राहूनही त्याचा फारसा परिणाम निकालावर झालेला नाही.

अनुपस्थितमध्ये 12 पैकी 7 राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार

विधानसभा अध्यक्षांच्या निवडीच्या दरम्यान जवळपास डझनभर आमदार हे उपस्थितच राहिले नाही. राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आजारी किंवा परदेशात असणाऱ्या आमदारांनीही हजेरी लावली होती पण अध्यक्षपदाच्या निवडी दरम्यान 12 आमदार उपस्थित राहू शकले नाहीत. यामध्ये सर्वाधिक 7 आमदार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे होते. यामध्ये नवाब मलिक, अनिल देशमुख, दत्ता भरणे,निलेश लंके, संजय बनसोडे, दिलीप मोहिते, बबन शिंदे यांचा समावेश होता तर भाजपाच्या मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप, कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे व रणजित कांबळे हे अनुपस्थित होते. तर एमआयएमचे मुफ्ती इस्माइल शाह हे देखील उपस्थित राहू शकले नव्हते.

आमदारांची दांडी, चर्चेला उधाण

एकीकडे विधानसभा अध्यक्षांची निवड ही प्रतिष्ठेची झाली होती. भाजपा व शिंदे गट एक झाल्याने चित्र स्पष्ट असले तरी प्रत्यक्ष निवडीच्या दरम्यान काय होणार याची उत्सुकता लागली होती. असे असतानाच तब्बल 12 जणांची अनुपस्थिती यामध्ये कोणी नाराज तर नाही ना अशी चर्चा रंगली होती. कारण एकट्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांची संख्या ही 7 वर होती. पण वेगवेगळ्या कारणांमुळे हे आमदार उपस्थित राहू शकलेले नाहीत. शिवाय याबाबत त्यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षांना माहितीही दिल्याचे समोर आले आहे. कॉंग्रसेच्या प्रणिती शिंदे आणि रणजीत कांबळे यांचे मात्र कारण समजू शकलेले नाहीत.

हे सुद्धा वाचा

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला गिरीश महाजन यांनी अनुमोदन दिलं. तर चेतन तुपेंकडून राजन साळवी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं कामकाज सुरू होताच राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी पोल मागितला. झिरवळ यांनी मतदान प्रक्रिया सुरू करण्यास प्रशासनाला आदेश दिले. त्यानंतर प्रत्येक सदस्यांजवळ जाऊन त्यांचे नाव नोंदवून घेतले गेले आणि मतदान प्रक्रिया पार पडली.राहुल नार्वेकरयांना 164 मते मिळाली. तर साळवी यांना 107 एवढ्याच मतांवर समाधान व्यक्त करावं लागलं.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें