Lok Sabha by-election results : समाजवादी पक्षाच्या हातातून रामपूरचा गड गेला, आता आझमगड लोकसभा क्षेत्राकडे नजरा

रामपूर लोकसभा जागेवर समाजवादी पक्षाचे आसीम राजा आणि भाजपचे घनश्याम लोधी निवडणूक रिंगणात होते. यात घनश्याम लोधी यांचा विजय झाला. बसपानं येथून उमेदवार उभा केला नव्हता. आझमगडमध्ये त्रिकोणी लढत होती.

Lok Sabha by-election results : समाजवादी पक्षाच्या हातातून रामपूरचा गड गेला, आता आझमगड लोकसभा क्षेत्राकडे नजरा
समाजवादी पक्षाच्या हातातून रामपूरचा गड गेला
Image Credit source: pti
गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 26, 2022 | 2:14 PM

लखनौ : भाजपसाठी रामपूरमधून मोठी बातमी आहे. घनश्याम लोधी (Ghanshyam Lodhi) यांनी लोकसभेची रामपूरची जागा जिंकली. समाजवादी पक्षाचा उमेदवार पराभूत झाला. उत्तर प्रदेशात आझमगड आणि रामपूर लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली. आझमगडचे निकाल अद्याप यायचे आहेत. या दोन्ही जागांसाठी समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि त्यांच्या कुटुंबीयांनी प्रचार केला होता. भाजपकडूनही दोन्ही जागांसाठी जोरदार प्रचार करण्यात आला होता. रामपूर आणि आझमगड या दोन्ही लोकसभेच्या जागांसाठी 23 जूनला मतदान झाले. 2019 रामपूर आणि आझमगडमधून (Azamgarh) समाजवादी पक्षाचे उमेदवार निवडून आले होते. परंतु, पोटनिवडणुकीत रामपूरमध्ये समाजवादी पक्षाला हार मानावी लागली. आझम खान यांच्यामुळं रामपूरची जागा रिक्त झाली होती. तर, आझमगड लोकसभा जागेवरून अखिलेश यादव यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून यादव यांनी यादव आणि मुस्लीम समीकरण मजबूत केले.

रामपूरमधून भाजपचे घनश्याम लोधी विजयी

रामपूर लोकसभा जागेवर समाजवादी पक्षाचे आसीम राजा आणि भाजपचे घनश्याम लोधी निवडणूक रिंगणात होते. यात घनश्याम लोधी यांचा विजय झाला. बसपानं येथून उमेदवार उभा केला नव्हता. आझमगडमध्ये त्रिकोणी लढत होती. समाजवादी पक्षाने माजी खासदार धर्मेंद्र यादव यांना मैदानात उतरविले होते. भाजपचे दिनेश लाल यादव निरहुया यांना उमेदवारी दिली. निरहुवा 2019 च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार होते. भाजपने यादव व्होट बँक खेचण्यासाठी निरहुया यांना तिकीट दिले होते. परंतु, त्यात यादवांनी निराशा केली. बसपानं शाह आलम यांना आझमगडमधून तिकीट दिले होते.

2019 मध्ये अखिलेश यादवांची मोठी आघाडी

अखिलेश यादव यांनी 2 लाख 60 हजार मतांनी आझमगडची जागा जिंकली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षानं रामपूर आणि आझमगड या दोन्ही जागा जिंकल्या होत्या. आझमगडवरून समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव आणि रामपूरवरून आझम खान यांची विजय मिळवला होता. विशेष म्हणजे 2019 मध्ये सपा अध्यक्ष आझमगड यांनी सुमारे 2 लाख 60 हजार मतांनी विजय मिळविला होता.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें