Devendra Fadnavis : सरकारमध्ये कुणीही सुपर सीएम नाही, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातच सरकार, माईक, चिठ्ठी प्रकरणांवर फडणवीसांचे स्पष्टीकरण

| Updated on: Jul 15, 2022 | 6:05 PM

मध्यंतरी पत्रकार परिषदे दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरील माईक घेऊन पत्रकाराच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. शिंदे गटात आमदार कुण्या पक्षातून येतात असा तो प्रश्न होता. याला एकनाथ शिंदे हे उत्तर देणार तेवढ्यात फडणवीस यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता.

Devendra Fadnavis : सरकारमध्ये कुणीही सुपर सीएम नाही, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातच सरकार, माईक, चिठ्ठी प्रकरणांवर फडणवीसांचे स्पष्टीकरण
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Follow us on

मुंबई: राज्याच्या (CM Eknath Shinde) मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हे विराजमान झाले असले तरी कारभार हा (Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच चालवत असल्याचा आरोप विरोधकांकडून वेळोवेळी झाला आहे. शिवाय गेल्या दोन दिवसांमधील प्रसंग यामुळे ते अधिक अधिरोखित झाले होते. एकतर भर (Press Conference) पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिठ्ठी दिली होती तर एकवेळी त्यांच्या समोरील माईक घेऊन स्वत: उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. या दोन्ही घटनांवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सरकारमध्ये कुणीही सुपर सीएम नाही, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातच सरकार असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘त्या’ माईकचे झाले असे की..

मध्यंतरी पत्रकार परिषदे दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरील माईक घेऊन पत्रकाराच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. शिंदे गटात आमदार कुण्या पक्षातून येतात असा तो प्रश्न होता. याला एकनाथ शिंदे हे उत्तर देणार तेवढ्यात फडणवीस यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. त्या दरम्यान, मी माईक हिसकावला नाहीतर संबंधित पत्रकाराने मुख्यमंत्र्यांना नाहीतर मला विचारला होता असे देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले. काहीजणांनी हे सरकार स्थापन झाले ते सहन होत नाही म्हणून असे बारकावे काढले जात असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

चिठ्ठी लिहली त्यामध्ये गैर काय?

शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक चिठ्ठी लिहून विषय मुख्यमंत्री यांना सुचवला होता. त्यावरुनही सरकार कोण चालवतंय हे आता सबंध राज्याला माहिती झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. पण माझ्या मुख्यमंत्र्यांना चिठ्ठी लिहणे यामध्ये गैर ते काय? असा उलट प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे कोणत्याही सरकारमध्ये सुपर सीएम ही संकल्पना नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृ्त्वामध्येच हे सरकार काम करीत आहे. विरोधकांकडून अफवा पसरवल्या जात असल्याचेही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

विरोधकांना बघवत, पण सवय ठेवा

ज्यांना हे सत्तांतर मान्य नाही त्यांना हे बघवत नाही. त्यामुळे रोज सकाळी 9 वाजता समोर येऊन टिका केली जाते. सध्या सरकराच्या माध्यमातून जे निर्णय घेतले जात आहेत. ते बघवत नसल्याने त्यांच्या मनाची घालमेल होत असल्याचा आरोप करीत फडणवीस यांनी संजय राऊतांना नाव न घेता टार्गेट केले.