मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा कट नव्हता? तपासात धक्कादायक ट्विस्ट

तपासात अत्यंत धक्कादायक खुलासा झाला आहे. यामुळे एकनाथ हल्ला करण्याचा कट नव्हताच का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा कट नव्हता? तपासात धक्कादायक ट्विस्ट
वनिता कांबळे

|

Oct 02, 2022 | 9:17 PM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचे वृत्त प्रसारित झाले आणि एकच खळबळ उडाली. मात्र, तपासादरम्यान मोठा ट्विस्ट समोर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा कट नव्हताच अशी माहिती उघडकीस आली आहे.

तपासात अत्यंत धक्कादायक खुलासा झाला आहे. यामुळे एकनाथ हल्ला करण्याचा कट नव्हताच का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर हल्ल्याचा कट असल्याची खोटी माहिती देणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.

अविनाश वाघमारे असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. लोणावळा पोलिसांनी अविनाश वाघमारेला अटक केली आहे. दारूच्या नशेत असताना वाघमारे याचे हॉटेल मालकाशी भांडण झाले. यामुळे वाघमारेने हे कृत्य केले असल्याचे समोर आले आहे.

वाघमारे हा मुळचा सांगलीतील आटपाडीचा रहिवासी आहे. मुंबईला जात असताना तो एका ढाव्यावर थांबला होता. यावेळी पाण्याच्या बाटलीवरुन त्याचे हॉटेल मालकाशी भांडण झाले.

या भांडणानंतर त्याने थेट पोलिस कंट्रोल रुमला खोटा फोन करुन पोलिस यंत्रणेची दिशाभूल केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली.

मुख्यमंत्र्याना पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली. या धमकीमुळे एकच खळबळ उडाली. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. तपास यंत्रणा देखील कामाला लागल्या. मात्र, तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आलेय.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें