AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar On Election: मध्यावधी होणार असे बोललोच नव्हतो; शिवसेना-भाजप सरकार आल्यानंतर निवडणुकांबाबत शरद पवारांचा खुलासा

राज्यातील राजकीय स्थिती आणि सध्याचे सरकार या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी भाष्य केले. मध्यावधी निवडणुका होतील, असे म्हणालोच नव्हतो, असे शरद पवार म्हणाले. काही दिवसांपासून राज्यात मध्यावधी निवडणूक लागतील असे अंदाज व्यक्त करण्यात येत होते. त्यावर शरद पवारांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

Sharad Pawar On Election: मध्यावधी होणार असे बोललोच नव्हतो; शिवसेना-भाजप सरकार आल्यानंतर निवडणुकांबाबत शरद पवारांचा खुलासा
Image Credit source: tv9
| Updated on: Jul 10, 2022 | 6:19 PM
Share

औरंगाबाद : आपल्या विशिष्ट भाषाशैलीमुळे राजकारणात ट्विस्ट आणणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार(Sharad Pawar) यांनी असेच एक वक्तव्य केले आहे. मध्यावधी होणार असे बोललोच नव्हतो असे म्हणत मध्यावधी निवडणुकांबाबत(Election) शरद पवारांनी खुलासा केला आहे. राज्यात शिवसेना-भाजप(Shivsena-BJP) सरकार अस्तित्वात आले आहे. यानंतर मध्यावधी निवडणुकांच्या चर्चेबाबत शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी असं म्हणालोच नव्हतो असे शरद पवारांनी सांगलीतले. औरंगाबाद येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेत मध्यावधी निवडणुका, औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा, राज्यपाल, शिंदे आणि फडणवीस यांची जवळीक अशा विविध विषयांवर भाष्य केले.

मध्यावधी निवडणुका होतील, असे म्हणालोच नव्हतो

राज्यातील राजकीय स्थिती आणि सध्याचे सरकार या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी भाष्य केले. मध्यावधी निवडणुका होतील, असे म्हणालोच नव्हतो, असे शरद पवार म्हणाले. काही दिवसांपासून राज्यात मध्यावधी निवडणूक लागतील असे अंदाज व्यक्त करण्यात येत होते. त्यावर शरद पवारांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

पुढील निवडणुकीसाठी अडीच वर्षांचा कालावधी आहे. कोणतीही निवडणूक असली की, सहा महिन्यांचा कालावधी मिळतो. त्या अनुशंगाने आपण पक्षातील नेत्यांना निवडणुकीसाठी तयारी लागण्याच्या सूचना केल्या होत्या असा खुलासा शरद पवारांनी केला आहे.

पुढील काळात येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढाव्यात अशी आपली इच्छा असल्याचे शरद पवार यांनी सांगीतले. महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवायची असल्यास एकत्र बसून चर्चा करुन  निर्णय  घ्यावे लागतील. विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाऊ अशी इच्छा होती, पण चर्चा झाली नव्हती. आमच्यात काही झाले नव्हते. जे गेलेत ते दुसरीकडचे गेले आहेत, त्यामुळे आम्ही काय करायचा प्रश्न नाही.

राज्यपाल चमत्कारिक व्यक्ती

या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनाही आपल्या खास शैलीत टोमणा हाणला. देशात आणि राज्यात ज्या गोष्टी घडतात त्यामुळे आमच्याही ज्ञानात भर पडत आहे.  मंत्रिमंडळाने विधानसभा अध्यक्षपद भरावं यासाठी प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला. राज्यपालांना कष्टदायी काम असल्याने वर्षभरात त्यांनी मंजूर केला नाही. नवे सरकार येताच 48 तासात राज्यपालांनी तत्परता दाखवली . महाराष्ट्राची परंपरा समृद्ध करणारे राज्यपाल राज्याने पाहिले आहेत. सध्याचे राज्यपाल चमत्कारिक आहेत, त्यांच्यावर बोलण्यास वाव आहे, पण मी बोलणार नाही,असे म्हणत त्यांनी राज्यपालांना चिमटा  काढला.

औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा नव्हता

महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात औऱंगाबादच्या नामांतराचा मुद्दा नव्हता. नामांतरापेक्षा शहरांच्या मुलभूत प्रश्नात लक्ष द्यायला हवे होते असे पवार यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीच्या शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत औरंगाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

आम्हाला भाजपची कुठलीही ऑफर नव्हती

लपूनछपून भेटायचं कायतर प्रेमप्रकरण चालू होतं पण आम्हाला भाजपची कुठलीही ऑफर नव्हती असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या रात्रीच्या भेटींच्या चर्चेबाबत भाष्य केले. सत्ता आपल्या हातातून गेली म्हणून काही लोकं अस्वस्थ होते. त्यांची अस्वस्था काही प्रमाणात दूर झाली असेल असे मी समजतो. .

बंडखोर आमदारांना सांगयाला काही निश्चित कारण नाही

बंडखोर आमदारांना सांगयाला काही निश्चित कारण नाही, म्हणून कोणी हिंदूत्वाचं कारण सांगतं, तर कुणी निधी दिला नाही म्हणून सांगतं. जो निर्णय घेतला त्या निर्णयाला काही आधार नाही. सरकार बनल्यानंतर अनेक लोक सांगायचे राष्ट्रवादीचे मंत्री जास्त काम करतात जास्त प्रश्न सोडवतात असा अनुभव मी आघाडीच्या नेत्यांकडून ऐकला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आता काहीह सक्षम कारण नाही. हे कार्य करण्यामागे काय प्रभावशाली होतं हे मला माहिती नाही असेही शरद पवार म्हणाले.

मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.