फडणवीसांसारख्या प्रगल्भ माणसाकडून ही अपेक्षा नाही; श्रेयवादाच्या टीकेला आव्हाडांचे प्रत्युत्तर

| Updated on: Feb 20, 2022 | 9:15 PM

राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. कोणाचे लग्न झाले तरी त्याचे श्रेय घ्यायचे, कोणाला मुलगा झाला तरी त्याचे देखील श्रेय घ्यायचे अशी टीका फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) केली होती.

फडणवीसांसारख्या प्रगल्भ माणसाकडून ही अपेक्षा नाही; श्रेयवादाच्या टीकेला आव्हाडांचे प्रत्युत्तर
जितेंद्र आव्हाड
Follow us on

ठाणे : राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. कोणाचे लग्न झाले तरी त्याचे श्रेय घ्यायचे, कोणाला मुलगा झाला तरी त्याचे देखील श्रेय घ्यायचे अशी टीका फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) केली होती. त्या टीकेला आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस यांच्यासारख्या प्रगल्भ माणसाने असं काहीतरी बोलावे हे अपेक्षित नसल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. ठाण्यात मला आजपर्यंत कुठेच श्रेयवादाची लढाई दिसली नाही. कार्यकर्त्यांचा हुरूप वाढवण्यासाठी तसं कधीकधी बोलावं लागतं असे आव्हाड यांनी म्हटले आहे. ते आज  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

काय म्हणाले आव्हाड?

यावेळी बोलताना आव्हाड यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीवर टीका करताना म्हणाले की, महाविकास आघाडीला प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेण्याचे सवय आहे. कोणाचे लग्न झाले तरी श्रेय घे, कोणाला मुलगा झाला तरी श्रेय घे अशी टीका त्यांनी केली. मात्र मला वाटते फडणवीस यांच्यासारख्या प्रगल्भ माणसाने असं काहीतरी बोलावे हे अपेक्षित नाही. ठाण्यात मला कुठेही श्रेयवादाची लाढई दिसली नाही. कार्यकर्त्यांचा हूरूप वाढवण्यासाठी कधी -कधी  बोलावे लागते असं म्हणत आव्हाड यांनी फडणवीसांना टोमणा लगावला आहे.

सुधीर पाटलांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी

कल्याण राष्ट्रवादीचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष वंडार पाटील यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांचा आजा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जितेंद्र आव्हाड यांनी हजेरी लावली. वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आव्हाड हे आज डोंबिवली पूर्वेतील गोलवली परिसरात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

संबंधित बातम्या

नेत्यांनो तुमच्या टाईमपासमुळे जनतेचे लाखो रूपये वाया, नरहरी झिरवळांनी कान उपटले

Hijab Controversy : हिजाब वादात प्रकाश आंबेडकरांची उडी! कायदा आणि संविधानाचा दाखला देत काय म्हणाले?

काँग्रेसशिवाय भाजपा विरोधी आघाडी यशस्वी होणार? राज्यातील काँग्रेस नेत्यांचं मत काय? जाणून घ्या