आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, गुजरात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार?

| Updated on: Nov 03, 2022 | 9:41 AM

आज केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, गुजरात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार?
Follow us on

नवी दिल्ली : सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे गुजरात (Gujarat) विधानसभा निवडणुकीकडे (Election). गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागली  आहे. ही निवडणूक चर्चेत येण्याचं आणखी एक कारण म्हणजे ‘आप’ देखील गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलं आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यात आहे. बड्या नेत्यांच्या गुजरातमध्ये फेऱ्या वाढल्याचं पहायला मिळत आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाची (Election Commission) दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेकडं लागल्या आहेत.

‘आप’ निवडणुकीच्या रिंगणात

आम आदमी पार्टीने सध्या आपलं लक्ष गुजरातवर केंद्रीत केलं आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंजाबमध्ये आपला मोठं यश मिळालं होतं. सत्ताधारी काँग्रेसला धक्का देत पंजाबमध्ये आपने सत्ता मिळवली. पंजाबनंतर आता आप गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.  त्यामुळे आता गुजरातमधील मतदार कोणाला कौल देतात हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातील नेते गुजरातला जाणार

सध्या गुजरातमध्ये भाजपाची सत्ता आहे. काही दिवसांमध्येच गुजरात विधानसभेची निवडणूक होणार आहे. गुजरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राज्य असल्यानं ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. पुन्हा एकदा गुजरातमध्ये भाजपची सत्ता कशी येईल यासाठी भाजप नेत्यांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून नेत्यांची मोठी फौज गुजरातला जाणार आहे. यामध्ये बारा आमदारांचा समावेश आहे. आपने देखील गुजरात निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केल्यानं भाजपकडून अधिक खबरदारी घेतली जात असल्याचं पहायला मिळत आहे.