साताऱ्यात दोन्ही राजेंचं शक्तिप्रदर्शन, उमेदवारी अर्ज दाखल करणार

| Updated on: Oct 01, 2019 | 10:15 AM

साताऱ्यातील दोन्ही राजे आज (1 ऑक्टोबर) आपल्या समर्थकांसह शक्तिप्रदर्शन (Udayanraje bhosale and shivendraraje bhosale filling election form)  करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

साताऱ्यात दोन्ही राजेंचं शक्तिप्रदर्शन, उमेदवारी अर्ज दाखल करणार
Follow us on

सातारा : साताऱ्यातील दोन्ही राजे आज (1 ऑक्टोबर) आपल्या समर्थकांसह शक्तिप्रदर्शन (Udayanraje bhosale and shivendraraje bhosale filling election form)  करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उदयनराजे, तर सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी शिवेंद्रराजे भोसले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे आज साताऱ्यात दोन्ही राजांच्या (Udayanraje bhosale and shivendraraje bhosale filling election form)  समर्थकांकडून मोठं शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीही दोन्ही राजेंच्या समर्थकांकडून विजयी संकल्प रॅली काढण्यात येणार आहे. यावेळी दोन्ही राजे या रॅलीमध्ये एकत्र पाहायला मिळणार आहेत. त्यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, दोन्ही राजेंनी भाजपात प्रवेश केल्यामुळे साताऱ्यातील सर्व राजकीय समीकरणं बदलून गेली आहेत.

काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. दोन्ही राजेंनी भाजपात प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला साताऱ्यात मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शिवेंद्रराजेंना कडवी लढत देण्यासाठी राष्ट्रवादीकडून दीपक पवार यांना सातारा-जावळी या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर उदयनराजेंच्या विरोधात अजूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादी संभ्रमात असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, उदयनराजे भोसले यांच्याविरोधात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनीही पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभा पोटनिवडणूक लढवावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. काल काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली. या यादीतही पृथ्वीराज चव्हाण यांना स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण उदयनराजेंच्या विरोधात उभे राहणार का? असा प्रश्न उपस्थित राहत आहे.