सुशांत सिंह प्रकरणी जे छाती बडवून घेत होते, ते आता कुठे गेले? : अनिल परब

| Updated on: Sep 28, 2020 | 3:42 PM

सुशांत सिंह प्रकरणात जे छाती बडवून घेत होते, असा सवालही अनिल परब यांनी उपस्थित केला आहे.(Anil Parab On Sushant Singh Suicide)

सुशांत सिंह प्रकरणी जे छाती बडवून घेत होते, ते आता कुठे गेले? : अनिल परब
Follow us on

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी शिवसेनेची नाहक बदनामी केली गेली. त्याची भरपाई कोण देणार, असा प्रश्न परिवहन मंत्री अनिल परब यांनी उपस्थित केला आहे. जे छाती बडवून घेत होते, ते आता कुठे गेले? असेही अनिल परब म्हणाले. (Anil Parab On Sushant Singh Suicide)

“बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांना स्क्रिप्ट लिहून दिलं होतं. तसे ते वागत होते. सुशांत सिंह प्रकरणात शिवसेनेची नाहक बदनामी केली गेली. त्याची भरपाई आता कोण देणार? सुशांत सिंह हा ड्रग्स घेत होता. हे सगळे सांगत आहेत. त्याच्यासाठी दिल्लीची टीम मुंबईत आली, पण काय साध्य झालं? सुशांत सिंह प्रकरणात जे छाती बडवून घेत होते, ते आता कुठे गेले?” असा सवालही अनिल परब यांनी उपस्थित केला आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नेहमीच भेटत असतात. आज मुख्यमंत्री शिवसेनेच्या सर्व आमदारांना भेटणार आहेत. ते आम्हाला नाही तर अजून कोणाला भेटणार? गेल्या काही दिवसांपासून व्हर्चुअल मीटिंग्स होत होत्या. आता प्रत्यक्ष बैठक होतं आहे,” असे अनिल परब म्हणाले.

“मराठा आरक्षणावरून कोणी राजकारण करू नये, सर्वांच्या संमतीनं हे विधेयक विधीमंडळात पास झालं होतं. मग आता राजकारण करायची काय गरज ? सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे,” असेही अनिल परब यांनी स्पष्ट केलं.

सुशांत प्रकरणात एनसीबीकडून दोन एफआयआर दाखल

सुशांत प्रकरणात एनसीबीने आतापर्यंत दोन एफआयआर दाखल केल्या आहेत. तर याच प्रकरणात रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty), शौविक चक्रवर्ती आणि ड्रग्ज तस्करांच्या चौकशीदरम्यान ज्यांची नावे समोर आली आहेत त्यांनाही एनसीबीकडून समन्स बजावण्यात आले आहेत. 50 बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटी सध्या एनसीबीच्या रडारवर आहेत. यात अनेक प्रसिध्द अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक आणि बी-ग्रेड चित्रपटाच्या निर्मात्यांची नावे असल्याचे म्हटले जात आहे.

जया साहाच्या चौकशी दरम्यान दीपिका पदुकोण (deepika padukone), सिमॉन खंबाटा (Simone khambatta) आणि करिश्मा प्रकाश यांची नावे समोर आली आहेत. तर, रकुलप्रीत सिंह (Rakul Preet Singh) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) यांची नावे रिया चक्रवर्तीने घेतली होती. यापैकी करिश्मा प्रकाश दीपिका पदुकोणची मॅनेजर असून, तिने दीपिकासाठी ड्रग्जची सोय केली होती. (Anil Parab On Sushant Singh Suicide)

संबंधित बातम्या : 

विश्वास नांगरे पाटील यांची शरद पवारांसोबत बैठक, भेटीचं कारण गुलदस्त्यात

“मराठा आणि राजपुतांचं देशासाठी बलिदान, राजपुतांनाही सरसकट आरक्षण द्या”