AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विश्वास नांगरे पाटील यांची शरद पवारांसोबत बैठक, भेटीचं कारण गुलदस्त्यात

विश्वास नांगरे पाटील यांनी सकाळी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांची भेट घेतली.

विश्वास नांगरे पाटील यांची शरद पवारांसोबत बैठक, भेटीचं कारण गुलदस्त्यात
| Updated on: Sep 28, 2020 | 1:45 PM
Share

मुंबई : मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दोघांची काही काळ चर्चा रंगली. भेटीचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. (Sharad Pawar meets Vishwas Nangare Patil at YB Chavan Centre)

विश्वास नांगरे पाटील यांनी आज (सोमवार 28 सप्टेंबर) सकाळी शरद पवारांची भेट घेतली. पवारांनी कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. दोघांमध्ये पाऊण तास चर्चा झाली होती. सलग दुसऱ्या दिवशीच्या या ‘भेटसत्रा’मुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र दोन्ही बैठकांमागील नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची 26 सप्टेंबरला मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये भेट झाली होती. दुपारी दीड ते साडेतीन असे तब्बल दोन तास ते एकत्र होते. संजय राऊत यांनी फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली होती. सुरुवातीला दोन्ही पक्षांनी अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, नंतर स्वतः संजय राऊत यांनीच या भेटीची कबुली दिली.

संजय राऊत काय म्हणाले?

“शिवसेनेत गुप्त बैठक करण्याची पद्धत नाही. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. ती काही भूमिगत बैठक नव्हती, आम्ही बंकर किंवा तळघरामध्ये भेटलो नव्हतो. त्यांची आणि माझी बऱ्याच दिवसापासून भेट झाली नव्हती” असे संजय राऊतांनी सांगितले.

“मला ‘सामना’साठी देवेंद्र फडणवीस यांची प्रदीर्घ मुलाखत घ्यायची आहे. महाराष्ट्रातील प्रमुख साहित्यविषयक संस्थांचीही इच्छा आहे, की मी संपादक म्हणून फडणवीसांची जाहीर मुलाखत करावी. त्यासंदर्भात चर्चा केली, एकत्र जेवलो, अगदी गोपनीय पद्धतीने जेवलो” असा टोला राऊतांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“आम्हाला सरकारमध्ये यायची कोणतीही घाई नाही. अशा सरकारसोबत मला काहीही तोडगा काढायचा नाही. त्यामुळे मी खूप स्पष्ट शब्दात सांगू इच्छितो की, सध्या परिस्थिती अशी आहे की आमच्या भेटीचे अनेक वेगवेगळे अर्थ काढण्यात आलेत. त्यामुळे हे टायमिंग चुकीचं आहे. मला लोकांचा राग आहे हे माहिती होतं पण त्यांचा इतका राग आहे हे माहिती नव्हतं. पण याचं कोणतंही राजकीय हेतू नाही,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Sharad Pawar meets Vishwas Nangare Patil at YB Chavan Centre)

नांगरे पाटील मुंबईत

ठाकरे सरकारने सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पोलिस दलात मोठे फेरबदल केले होते. नाशिक पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी नियुक्ती झाली.

संबंधित बातम्या 

गोड शहरातून निघताना अंतःकरण जड, नाशिक पोलीस आयुक्तपद सोडताना विश्वास नांगरे पाटील भावूक

उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शरद पवार ‘वर्षा’वर, पाऊण तास चर्चा

फडणवीसांसोबत बैठक गुप्त नव्हती, आम्ही वैयक्तिक शत्रू नाही : संजय राऊत

(Sharad Pawar meets Vishwas Nangare Patil at YB Chavan Centre)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.