दसरा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास; 250 हून अधिक शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना

| Updated on: Sep 26, 2022 | 2:04 PM

शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यासाठी शिवाजी पार्क मिळाल्यानं शिवसैनिकांमध्ये एक वेगळाच उत्साह आहे.  दसरा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी अहमदनगरचे अनेक शिवसैनिक  हे मुंबईच्या दिशेने पायी रवाना झाले आहेत.

दसरा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास; 250 हून अधिक शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना
Follow us on

अहमदनगर : गेले काही दिवस दसरा मेळाव्यावरून राजकारण चांगलचं तापलं होतं.  शिंदे गट आणि शिवसेना दोघांनाही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास मुंबई महापालिकेने (BMC) परवानगी नाकारली होती. त्यानंतर शिवसेनेने महापालिकेच्या या निर्णयाविरोधात हाय कोर्टात (High Court) याचिका दाखल केली. न्यायालयाने शिवसेनेला (Shiv Sena) दिलासा देत शिवाजी पार्कवर दसरा मेळाव घेेण्याची परवानगी दिली आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये एक वेगळाच उत्साह आहे. गेले दोन वर्ष शिवसैनिकांना कोरोनामुळे दसरा मेळाव्यात सहभागी होता आले नाही, मात्र यंदा शिवसैनिक दसरा मेळाव्याला रेकॉर्ड ब्रेक गर्दी करण्याची शक्यता आहे.

शिवसैनिकांची पायी वारी

शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यासाठी शिवाजी पार्क मिळाल्यानं शिवसैनिकांमध्ये एक वेगळाच उत्साह आहे.  दसरा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी अहमदनगरचे अनेक शिवसैनिक  हे मुंबईच्या दिशेने पायी रवाना झाले आहेत.

250 हून अधिक शिवसैनिक अहमदनगरहून मुंबईच्या दिशेने दसरा मेळाव्यासाठी निघाले आहेत. या शिवसैनिकांंमध्ये जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, नागरसेवक यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे महिला देखील यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या आहेत. हे शिवसैनिक मेळ्याव्याच्या दिवशी मुंबईत दाखल होणार आहेत.

हे सुद्धा वाचा

शिंदे गटाची तयारीही जोरात

यंदा एक नव्हे तर  दोन दसरा मेळावे होणार आहे. एक शिंदे गटाच आणि दुसरा शिवसेनेचा जास्तीत जास्त गर्दी खेचण्यासाठी दोन्ही गटांमध्ये स्पर्धा सुरू असल्याचं पहायला मिळत आहे.  याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून देखील दसरा मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यंदा शिवसैनिक कोणाच्या मेळाव्याला हजेरी लावतात हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.  दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.