कोण तुषार भोसले? मोठं होण्यासाठी काही जणांची सत्ताधाऱ्यांवर टीका, उदय सामंतांचा निशाणा

| Updated on: Nov 06, 2020 | 6:00 PM

कोण तुषार भोसले? मोठं होण्यासाठी काही जण सत्ताधाऱ्यांवर टीका करतात, अशा शब्दात उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसले यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

कोण तुषार भोसले? मोठं होण्यासाठी काही जणांची सत्ताधाऱ्यांवर टीका, उदय सामंतांचा निशाणा
Follow us on

मुंबई : राज्यातली मंदिरं उघडण्याच्या मागणीवरुन भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडी आमनेसामने आले आहेत. ‘कोण तुषार भोसले? मोठं होण्यासाठी काही जण सत्ताधाऱ्यांवर टीका करतात’, अशा शब्दात उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसले यांना प्रत्युत्तर दिलं आहे. (Uday Samant Criticized Tushar Bhosale)

गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आध्यात्मिक आघाडीच्या वतीने मंदिरं उघडली जावीत, या मागणीसाठी आंदोलने केली जात आहेत. आज (शुक्रवार) तुषार भोसलेंनी तुळजापुरात आंदोलन केलं. यानंतर त्यांनी राज्य सरकारवर टीका करताना ‘ठाकरे सरकार हे ब्रिटीशांपेक्षा काळं सरकार’ असल्याचं म्हटलं. भोसलेंच्या या टीकेला सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं.

“तुषार भोसले कोण आहे मला माहिती नाही. आपल्या पक्षश्रेष्ठीसमोर स्वतःला मोठं करण्यासाठी अशी काही मंडळी आपल्या नेत्यांच्या समोर सत्ताधाऱ्यांवर टीका टिप्पणी करत असतात. अशा व्यक्तींबद्दल मंत्री म्हणून बोलणे मला योग्य वाटत नाही आणि त्याची दखल घेणं हे देखील योग्य वाटत नाही”, असं सामंत म्हणाले.

मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केले होते. त्यावर बोलताना सामंत म्हणाले, “मेट्रो कार शेड प्रकरणात आदित्य ठाकरे हे त्यांच्या कार्यातून विरोधकांना उत्तर देतील. काही लोकं ट्विटर आणि पत्रकार परिषद घेऊन या मुद्द्याला भरकटवत आहे”.

“शिवसेना सरकार टिकवण्यासाठी हिंदुत्वाला विसरली आहे. पोलिसांचा वापर करुन आमचं आंदोलन दाबण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. मात्र राज्यातील मंदिरं उघडेपर्यंत आम्ही आमची मागणी लावून धरु”, असा निर्धार तुषार भोसले यांनी व्यक्त केलाय.

काही सोंगाडे स्वतःला साधूसंत समजतात- अमोल मिटकरी

“साधूसंत सरकार पाडतील, साधूसंत म्हणजे नेमके कोण?, ते आंदोलन करणारे भोसले स्वतःला साधूसंत म्हणवून घेत आहेत. मग साधूसंतांची नक्की व्याख्या कोणती?”, असा थेट सवाल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी उपस्थितीत केला आहे. मंदिरं उघडण्यासाठी भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसलेंनी तुळजापुरात आंदोलन केलं आहे. त्या आंदोलनावर टीका करताना अमोल मिटकरींनी भोसलेंवर जोरदार प्रहार केला आहे. काही सोंगाडे स्वतःला साधूसंत समजतात, तुम्हाला हरिपाठ पाठ आहे का सांगा?, अशी टीकासुद्धा मिटकरींनी भोसलेंवर केली आहे.

(Uday Samant Criticized Tushar Bhosale)

संबंधित बातम्या

काही सोंगाडे स्वतःला साधूसंत समजतात, तुम्हाला हरिपाठ पाठ आहे का सांगा, मिटकरींचा तुषार भोसलेंवर हल्लाबोल