AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हसू नका, शिट्या वाजवायला काय झालं, उदयनराजेंनी झापलं, नमाजाला भाषण रोखलं

सातारा: सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी साताऱ्यात प्रचंड शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते. नमाजाला भाषण रोखलं उदयनराजे भोसले यांचं भाषण सुरु झालं त्यावेळी दुपारचं नमाज सुरु झालं. जोहारचं […]

हसू नका, शिट्या वाजवायला काय झालं, उदयनराजेंनी झापलं, नमाजाला भाषण रोखलं
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:07 PM
Share

सातारा: सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी साताऱ्यात प्रचंड शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते.

नमाजाला भाषण रोखलं

उदयनराजे भोसले यांचं भाषण सुरु झालं त्यावेळी दुपारचं नमाज सुरु झालं. जोहारचं नमाज सुरु झाल्याने उदयनराजेंनी भाषण रोखलं. हे नमाज झाल्यानंतर उदयनराजेंनी आपली बँटिंग सुरु केली.

मोदींवर हल्लाबोल

पाच वर्षपूर्वी ज्यांना बहुमत दिले, त्यांनी मन की बात करुन करुन अभिनय केला. मात्र काहीच पदरात पडले नाही, दिशाभूल केली, असा आरोप उदयनराजेंनी मोदींवर केला.

तळागाळातील जनता गाळात

बहुमत मिळाल्यावर विसर पडला. तळागाळातील जनता आणखी गाळात गेली. 15 लाख मिळाले नाहीत. मात्र नोटबंदीत पैसे काढून घेतले. अडीच कोटी नोकरी दिली नाही. मात्र बेरोजगार झाले, असे टोमणे उदयनराजेंननी लगावले.

देशापेक्षा उद्योजक मोठा कसा?

या सरकारने भिकेला लावलं,आपण आता विचार केला पाहिजे, पाच वर्षात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या. शेतकरी राजा असून आता जन की बात सुनावली पाहिजे.  ब्रिटिश ईस्ट कंपनीसारखं छाटछूट कंपानीने राज्य केलं. नावापुरती लोकशाही असून हुकूमशाही सुरु आहे. ठराविक उद्योगपतींना अधिकार दिले. ईस्ट इंडिया कंपनीसारखी बिजनेस कंपनी निर्माण केली,देशापेक्षा उद्योजक मोठा कसा? उद्योजक उद्या नद्या विकतील, मग त्यांच्याकडून पाणी विकत घ्यायचं का, असा सवाल उदयनराजेंनी विचारला.

हसू नका, शिट्या वाजवायला काय झाले

यादरम्यान काही लोक हसत होते, शिट्ट्या वाजवत होते, त्यावेळी हसू नका, शिट्या वाजवायला काय झाले, असं म्हणत उत्साही कार्यकर्त्यांना उदयनराजेंनी झापले.

लाईट गेली

सत्तांतराशिवाय गत्यंतर नाही, नाहीतर रशिया सारखे तुकडे होतील, असं उदयनराजे म्हणाले. याचदरम्यान लाईट गेल्याने उदयनराजेंनी माईक सोडून भाषण केलं.

अहंकार माजला आहे. ठीक आहे, पाहून घेऊ अशी भाषा ते करतात. सरकार उलथून टाकल्याशिवाय राहायचं नाही, सरकार गेले नाही तर सोमालिया होईल, कायदा कानून नाही, बलात्कार, खून होतोय, ही अवस्था आपली होईल, असं उदयनराजे म्हणाले.

डायलॉगबाजी

मैं बोलता हू ओ मैं करता हूँ और जो नही बोलता हूँ ओ मैं डेफिनेटली करता हूं, असं म्हणत उदयनराजेंनी त्यांच्या स्टाईलमध्ये डायलॉगबाजी केली.

शिवस्मारक भूमीपूजनाला इस्त्रायलची सुरक्षा

आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्री स्मारक भूमीपूजन निमंत्रण दिले होते. आम्ही बोटीतून चाललो होतो, या बोटीत पंतप्रधान, मुख्यमंत्री होते, पूजा सुरु होती, त्यावेळी इंग्रजी बोलणारी अंतर्गत सुरक्षा होती, इनर सेक्युरीटी इस्त्रायलची सुरक्षा होती. मात्र आपल्या जवानांमध्ये काय कमी आहे, असा सवाल उदयनराजेंनी केला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...