उद्धव ठाकरे युतीच्या शिल्पकाराच्या स्मृतीस्थळी, गोपीनाथ गडावर जाऊन दर्शन घेणार

उद्धव ठाकरे या दौऱ्यादरम्यान, बीड जिल्ह्यात जाऊन, युतीच्या शिल्पकारांपैकी एक असलेले भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेणार आहेत.

उद्धव ठाकरे युतीच्या शिल्पकाराच्या स्मृतीस्थळी, गोपीनाथ गडावर जाऊन दर्शन घेणार
Follow us
| Updated on: Nov 05, 2019 | 12:18 PM

बीड :  राज्यातील शिवसेना-भाजप युतीचा (Shiv Sena BJP) सत्तेचा संघर्ष कायम आहे. एकीकडे वाटाघाटी सुरु असताना, दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray at Gopinath Gad) पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray at Gopinath Gad)आज नांदेड जिल्ह्यातील कंधार, लातूरमधील अहमदपूर, तर परभणीतील गंगाखेड तालुक्यांना भेटी देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.

महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे या दौऱ्यादरम्यान, बीड जिल्ह्यात जाऊन, युतीच्या शिल्पकारांपैकी एक असलेले भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेणार आहेत. उद्धव ठाकरे बीडमधील गोपीनाथ गडावर जातील.

गोपीनाथ गडावर धनुष्यबाण आणि भाजपचं कमळ यांची एकत्रितरित्या रांगोळी काढण्यात आली आहे. दिवंगत ने गोपीनाथ मुंडेंच्या समाधीस्थळी रेखाटलेली  कमळ आणि धनुष्यबाणाची रांगोळी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. “आठवण साहेबांची” असे भावनिक शब्दही लिहिण्यात आले आहेत.

उद्धव ठाकरेंचा दौरा

राज्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे मराठवाड्यात आहेत. गंगाखेडमध्ये ओल्या  दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करुन उद्धव ठाकरे माजलगावला जाणार आहेत. परळी वैजनाथमार्गे ते माजलगावला जातील.

या मार्गावर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं समाधीस्थळ असलेल्या गोपीनाथगडाला ते भेट देतील. तिथून माजलगावला रवाना होतील.

गोपीनाथगडाचं महत्त्व काय?

बीडमध्ये परळीजवळ पांगऱ्याच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात 18 एकरमध्ये गोपीनाथगड उभारण्यात आला आहे. हा गड पारंपरिक नाही. बीड जिल्ह्यात भगवानगडाच्या उपासकांची संख्या लाखोंमध्ये आहे. गहिनीनाथगड, भगवानबाबा गड आणि नारायणगड हे बीड जिल्ह्यातील गाजणारे गड आहेत. मराठवाड्याचे सुपुत्र गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ गोपीनाथगड उभारण्यात आला आहे.

राज्याच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे यांनी बीड जिल्हा आणि एकूणच मराठवाड्याला अधिक प्राधान्य दिले होते. साखर आणि सहकार या क्षेत्रात तर त्यांनी नवे पायंडे रचलेच होते. त्यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या वैद्यनाथ साखर कारखान्याने अनेक उच्चांक मोडीत काढले होते. त्यांच्या स्मरणार्थ गोपीनाथ गड उभारण्यात आला गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनातील 18 ते 20 महत्त्वाचे प्रसंग साकारण्यात आले आहेत. विधानसभेसारखी रचना असलेल्या एका विभागात मुंडे यांची विधानसभेतील गाजलेली भाषणे ऐकता येतात. त्यांना मिळालेल्या विविध पुरस्कारांच्या संग्रहांसह एक फोटो गॅलरी आहे. त्यांचा भव्य असा 22 फुटी पुतळा या ठिकाणी उभारला आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.