कोणी रिक्षावाला, कोणी भाजीवाला, तर कोणी पान टपरीवाला, ठाकरे सरकारमधील फायरब्रँड मंत्री

उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांचा प्रवास विशेष उल्लेखनीय आहे. यामध्ये सेना नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा समावेश आहे.

कोणी रिक्षावाला, कोणी भाजीवाला, तर कोणी पान टपरीवाला, ठाकरे सरकारमधील फायरब्रँड मंत्री
Follow us
| Updated on: Jan 06, 2020 | 12:59 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर बहुप्रतीक्षित खातेवाटपही झालं. आता मंत्री आपापला पदभार स्वीकारुन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये नव्या-जुन्या चेहऱ्यांचा ताळमेळ घालण्यात आला आहे. कोणाला राजकीय पार्श्वभूमी आहे, तर कोणी गॉडफादर नसतानाही स्वत:च्या हिमतीवर मंत्रिपदापर्यंत मजल मारली आहे. (Uddhav Thackeray Ministers profile)

अनेक आमदारांचा मंत्रिपदापर्यंतचा प्रवास संघर्षाचा आणि प्रेरणादायी आहे. उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांचा प्रवास विशेष उल्लेखनीय आहे. यामध्ये सेना नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा समावेश आहे. कोणी पान टपरीवाला, कुणी भाजीवाला तर कुणी रिक्षावाला असणारा आता थेट कॅबिनेट मंत्री झाला आहे.

एकनाथ शिंदे : रिक्षाचालक ते कॅबिनेट मंत्री (Eknath Shinde profile)

एकनाथ संभाजी शिंदे… उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाचा आणि मुख्यमंत्र्यांच्या विश्वासू चेहरा. ठाकरे सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खात्याची जबाबदारी आहे. यापूर्वीचे मुख्यमंत्री नगरविकास खातं स्वत:कडेच ठेवत असत. त्यावरुन या खात्याचं महत्त्व समजू शकतो. मात्र उद्धव ठाकरे यांनी हे महत्त्वाचं खात एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवलं. एकनाथ शिंदे हे थेट मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. त्यावरुनही एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेतील दबदबा लक्षात येऊ शकतो.

एकनाथ शिंदे यांना शिवसेनेत इतकं महत्त्व का? या प्रश्नाचं उत्तर त्यांचा राजकीय प्रवास पाहता मिळू शकतं.

एकनाथ शिंदे यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 रोजी झाला. शिंदे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील दरे या गावचे. मात्र शिंदे कुटुंब ठाण्यात आलं त्यावेळी उदरनिर्वाहासाठी एकनाथ शिंदे यांना विविध कामं करावी लागली. सुरुवातीच्या काळात ते एका कारखान्यात सुपरवायझर होते. मात्र नंतर त्यांनी रिक्षाचालक म्हणून काम सुरु केलं.

तरुण वयात एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याने प्रभावित झाले. शिवाय ठाण्यात आनंद दिघे यांचाही प्रभाव त्यांच्यावर होता. त्यामुळे ते शिवसेनेत आकर्षित झाले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्यामुळे प्रभावित होऊन 1980 च्या दशकात शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण आणि राजकारणाला सुरुवात केली. 1984 साली किसननगर येथे शाखाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. शिवसैनिक या नात्याने अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतला. सीमा आंदोलनात तुरुंगवासही भोगला.

राजकीय कारकीर्द

  • 1997 साली पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले
  • सन 2001 मध्ये सभागृहनेतेपदी निवड. सलग तीन वर्षे पद सांभाळले
  • सन 2004 मध्ये त्यावेळच्या ठाणे विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून विजयी
  • सन 2005 मध्ये शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती.
  • सन 2009 मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून पुन्हा आमदार
  • सन 2014 साली विजयाची हॅटट्रिक. विरोधी पक्षनेतेपदी निवड
  • डिसेंबर 2014 मध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ. एमएसआरडीसीचे मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला
  • जानेवारी 2019 मध्ये आरोग्यमंत्रीपदी निवड
  • डिसेंबर 2019 मध्ये ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेटपदाची शपथ
  • जानेवारी 2020 मध्ये नगरविकास मंत्रिपदी नियुक्ती

 छगन भुजबळ : भाजीवाला ते कॅबिनेट मंत्री (Chhagan Bhujbal profile)

मूळचे शिवसैनिक असलेले छगन भुजबळ यांची राजकीय कारकीर्द मोठी आहे. भुजबळांचा संघर्षही मोठा आहे. छगन भुजबळ यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1947 रोजी नाशिकमध्ये झाला. नाशकातील येवला या मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करतात.

छगन भुजबळ हे पूर्वी आक्रमक शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे. भुजबळांचा शिवसेना प्रवेशही रंजक आहे. भुजबळ हे पूर्वी मुंबईतील भायखळा मार्केटमध्ये भाजीविक्रीचं काम करत होते. त्याचवेळी ते शिवसेनेच्या कामाने प्रभावित झाले आणि बाळासाहेबांच्या संपर्कात आले.

मुंबईतील व्हिक्टोरिया ज्य़ुबिली टेक्निकल इन्स्टिट्यूटमधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरिंगमधील पदविका घेतली. तरुणपणी ते शेती व शेतीवर आधारित व्यवसाय करत होते. मात्र अगदी सुरुवातीपासून त्यांना महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात रस होता.

राजकीय कारकीर्द

  • भुजबळ हे 1973 मध्ये मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. 1973 ते 84 ते महापालिकेत विरोधी पक्षनेता बनले, तर 1985 मध्ये महापौर झाले. 1991 मध्ये ते दुसऱ्यांदा महापालेकेत मुंबईचे महापौर झाले.
  • 1991 मध्ये त्यांचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेशी टोकाचे मतभेद झाले आणि कालांतराने त्यांनी याचवर्षी सेनेला जय महाराष्ट्र केला.
  • 1991 पर्यंत शिवसेनेत, 1991 नंतर काँग्रेस पक्षात कार्यरत,
  • जून 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य, संस्थापक सदस्य
  • जून 1999 ते नोव्हेंबर 1999 महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे पहिले प्रदेशाध्यक्ष,
  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षः 1985-90, 1990-95, 2004-2009, 2009-2014, 2014-19 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा.
  • 1996-2002 व 2002-2004 सदस्य, महाराष्ट्र विधानपरिषद; डिसेंबर 1991 ते मार्च 1993 महसूल खात्याचे मंत्री;
  • मार्च 1993 ते मार्च 1995 गृहनिर्माण, गलिच्छ वस्तीसुधार, घरदुरुस्ती आणि पुनर्बांधणी खात्याचे मंत्री;
  • 1996 – 1999 विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधानपरिषद;
  • ऑक्टोबर 1999 ते जानेवारी 2003 महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व गृह आणि पर्यटन मंत्री,
  • जानेवारी 2003 ते डिसेंबर 2003 उपमुख्यमंत्री व गृह मंत्री;
  • नोव्हेंबर 2004 ते ऑक्टोबर 2009 सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) या खात्यांचे मंत्री
  • नोव्हेंबर 2009 ते नोव्हेंबर 2010 दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) खात्याचे मंत्री;
  • नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2014 सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री;
  • ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड.
  • जानेवारी 2020 – ठाकरे सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री

गुलाबराव पाटील : पानटपरीवाला ते कॅबिनेट मंत्री (Gulabrao Patil profile)

ठाकरे सरकारमधील सध्याचा आक्रमक शिवसैनिक म्हणून पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील ओळखले जातात. गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. 5 जून 1966 रोजी जन्मलेल्या गुलाबराव पाटलांचा मंत्रिपदाचा प्रवास रंजक आहे.

गुलाबराव पाटील हे बहुतेक भाषणात आपण पानटपरीवाला होतो, पानटपरीवाल्याला बाळासाहेबांनी मंत्री बनवलं, अशी आठवण सांगतात. साधा पण आक्रमक, सरळ आणि निष्ठावान शिवसैनिक अशी गुलाबराव पाटलांची ओळख.

‘नशीब’ पानटपरी

गुलाबराव पाटील हे जळगावजवळच्या पाळधी या खेड्यात पानटपरी चालवत होते. या पानटपरीचं नाव ‘नशीब’ असं होतं. तरुण वयात गुलाबराव पाटीलही शिवसेनेच्या संपर्कात आले आणि बघता बघता कट्टर शिवसैनिक झाले. अनेक आंदोलनात गुलाबराव पाटील सहभागी होऊ लागले. गावरान भाषणांनी सभा गाजवू लागले. फर्डा वक्ता अल्पावधीतच शिवसेनेचा फायरब्रँड नेता म्हणून उदयास आला. गुलाबराव पाटील हे 1999 मध्ये आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले.

गुलाबराव पाटील राजकीय कारकीर्द

  • 1999 – विधानसभेवर पहिल्यांदा निवडून गेले
  • 2004 – विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा विजयी
  • 2009 – विधानसभेला पराभव, शिवसेना उपनेतेपदी निवड
  • 2014 – विधानसभा निवडणुकीत विजयी
  • 2016-2019 – फडणवीसांच्या मंत्रिमंडळात सहकार राज्यमंत्री म्हणून कामकाज
  • 2019 – विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा विजय
  • जानेवारी 2020 – ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी
Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.