.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना मिळाली, शिंदेंचं पुढचं पाऊल काय? ‘या’ कार्यलयावर हक्क सांगणार, ठाकरे गटाची रणनीतीही ठरली!

Uddhav Thackeray गटातर्फे शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी अखेरचे प्रयत्न होत आहेत. निवडणूक आयोगाच्या निकालाला आव्हान देत ठाकरे गट आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे.

शिवसेना मिळाली, शिंदेंचं पुढचं पाऊल काय? 'या' कार्यलयावर हक्क सांगणार, ठाकरे गटाची रणनीतीही ठरली!
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Feb 20, 2023 | 10:23 AM
Share

मुंबईः निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना (Shivsena) ही एकनाथ शिंदे यांच्या गटाची असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांची ताकद वाढल्याचे चित्र आहे. याच निर्णयाच्या बळावर एकनाथ शिंदे यांची शिवसेना अधिक आक्रमक पावले टाकत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईत शिंदे गटाच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांच्या उपस्थितीत ही बैठक होत आहे. यात शिंदे गटाचे आमदार उपस्थित राहणार असून या बैठकीनंतर सर्व आमदार विधानसभा अध्यक्ष भरत गोगावले यांची भेट घेणार आहेत.

विधीमंडळ कार्यालयावर हक्क सांगणार

शिवसेना पक्ष आणि चिन्ह आयोगाकडून मिळाल्यानंतर शिंदे गट आता राज्यभरातील शिवसेनेची कार्यालयं ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत. याच मालिकेत शिंदे गटाचे आमदार विधीमंडळलातील शिवसेना कार्यालयावर हक्क सांगतील. येत्या २७ फेब्रुवारी रोजी राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची महत्त्वाची बैठक होत आहे.

ठाकरे गटाची आजची रणनीती काय?

दरम्यान उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देण्याची तयारी पूर्ण झाली आहे. घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरे गटाचे नेते आणि उल्हास बापट यांच्यादरम्यान महत्त्वाची चर्चा झाल्याचं कळतंय. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट कोर्टात जाणार आहे. मात्र ही दाद सुप्रीम कोर्ट का दिल्ली हायकोर्टात मागयची, यावरून ठाकरे गटात संभ्रम होता. मात्र ठाकरे गट सुप्रीम कोर्टातच याचिका दाखल करणार असल्याचे स्पष्ट आहे. दरम्यान, मातोश्रीबाहेर आज ठाकरे गटाच्या शिवसेनेतर्फे मोठं शक्तिप्रदर्शन होणार आहे. राज्यभरातून आलेले शिवसैनिक या शक्तिप्रदर्शनात पक्षाची ताकद दाखवतील.

शिंदे गटाचेही कॅव्हेट

दरम्यान, उद्धव ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत असल्याने शिंदे गटानेही पुढची रणनीती आखली आहे. ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली तर एकतर्फी सुनावणी घेऊन कोणताही आदेश जारी केला जाऊ नये म्हणून एकनाथ शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केले आहे.

कॅव्हेट म्हणजे काय?

एखादं प्रकरण कोर्टासमोर दाखल होण्याची शक्यता असल्यास पक्षकार कॅव्हेट दाखल करू शकतो. सदर खटल्यात आपल्यालाही म्हणणं मांडण्याची संधी द्यावी, अशी विनंती कॅव्हेटद्वारे कोर्टाकडे केली जाते. कॅव्हेट दाखल करणाऱ्या पक्षकाराला भविष्यात येणाऱ्या खटल्यात आपली बाजू बांडण्याची पूर्ण संधी दिली जाते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतरच कोर्टाकडून निकाल दिला जातो.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर