AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युक्रेन बेचिराख होण्याच्या मार्गावर; एका पुलाचा बदला घेण्यासाठी 75 क्षेपणास्त्रं डागली….

पूल उडवले म्हणून पुतिनने युक्रेनवर एकामागून एक 75 क्षेपणास्त्रे डागली.

युक्रेन बेचिराख होण्याच्या मार्गावर; एका पुलाचा बदला घेण्यासाठी 75 क्षेपणास्त्रं डागली....
| Updated on: Oct 10, 2022 | 10:47 PM
Share

कीवः रशियाला क्रिमियन द्वीपकल्पाशी (Russia with the Crimean Peninsula)  जोडणाऱ्या पुलावर शनिवारी घडवून आणलेल्या स्फोटात युक्रेनसाठी हा इतका मोठा प्राणघातक हल्ला ठरेल याची कल्पनाही कोणी केली नव्हती. खरेतर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (President Vladimir Putin) यांनी रशियाला क्रिमियाशी जोडणाऱ्या केर्च ब्रिजवर झालेल्या हल्ल्याला युक्रेनने (Ukraine) केलेल्या या हल्लाला रशियाकडून हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर त्या रागामुळेच पुतिन यांनी युक्रेनवर एकामागून एक 75 क्षेपणास्त्रे डागण्यात आली.

त्या पुलावर केलेल्या हल्ल्यामुळे पुतिन यांच्याकडून तीव्र हल्ला चढवण्यात आला आणि सारं काही काही उद्ध्वस्त करण्यासच त्यांनी सुरुवात केली.

वास्तविक हा पूल पुतिन यांच्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट होता. त्याचे उद्घाटनही त्यांनी केले होते. आणि या पुलावर ट्रक चालवून त्यांनी हिरवा झेंडा दाखवून तो सुरूही केला होता.

हा पूल क्रिमियाला रशियाशी जोडतो आणि रशियासाठी क्रिमिया खूप महत्त्वाचा भाग आहे.

रशिया आणि क्रिमिया यांच्यातील व्यापारासाठी हा पूल महत्त्वाची असून व्यापारासाठी तो महत्वाची भूमिका बजावतो. या पुलावरील स्फोटामुळे रशियापासून क्रिमियाच्या दळणवळणावर मोठा परिणाम झाला आहे.

यामुळे क्रिमियामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा ठप्प होण्याचा धोकाही संभवला जात आहे. त्याबरोबरच रशिया या पुलावरून दक्षिण युक्रेनमध्ये युद्धासाठी लष्करी साहित्यही याच पुलावरुन पाठवले जाते.

युद्धात या पुलाव हल्ला चढवल्यानंतर मात्र लष्करी साहित्य आणि त्यांच्या हालचालींवरही मोठा परिणाम होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पुतिन यांनी 8 वर्षांपूर्वी युक्रेनमधून क्रिमिया ताब्यात घेतलं होतं.

पुलावरील स्फोटानंतर पुतिन यांनी रविवारी रशियन तपास समितीचे अध्यक्ष अलेक्झांडर बॅस्ट्रिकिन यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सांगितले की, महत्त्वपूर्ण नागरी पायाभूत सुविधा नष्ट करण्याच्या उद्देशाने हे दहशतवादी कृत्य असल्याचे त्यानी स्पष्ट त्यावेळी स्पष्ट केले आहे.

या पुलावरील स्फोट इतका जबरदस्त होता की, आगीमध्ये हा पूल जळून खाक झाला आहे. पुलाचे दोन भाग अर्धवट कोसळले असून धुराचे लोट पसरले आहेत.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.