AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित शाह रुग्णालयात अॅडमिट, 4-5 वैद्यकीय चाचण्या, छोटी शस्त्रक्रिया

भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गुजरातमधील अहमदाबादच्या खासगी रुग्णालयात अमित शाह (Amit Shah) अॅडमिट झाले आहेत.

अमित शाह रुग्णालयात अॅडमिट, 4-5 वैद्यकीय चाचण्या, छोटी शस्त्रक्रिया
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Sep 04, 2019 | 12:18 PM
Share

अहमदाबाद : भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गुजरातमधील अहमदाबादच्या खासगी रुग्णालयात अमित शाह (Amit Shah) अॅडमिट झाले आहेत. अमित शाहांवर छोटी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यांच्या 4 ते 5 प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या झाल्या.

अमित शाह यांच्यावर के डी रुग्णालयात (KD hospital) शस्त्रक्रिया होणार आहे. मात्र ही नेमकी कोणती शस्त्रक्रिया आहे याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही.

अमित शाह हे नुकतंच महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. अमित शाह हे एक तारखेला सोलापुरातील भाजपच्या महाजनादेश यात्रेला उपस्थित होते. यानंतर ते मुंबईत लालबाग, सिद्धिविनायक गणपतीच्या दर्शनाला आले होते. तिथून ते दिल्लीला रवाना झाले.

अमित शाह बुधवारी म्हणजे आज गुजरातला वैयक्तिक कारणांसाठी जाणार असल्याचं सांगण्यात येत होतं. त्याचं कारण अस्पष्ट होतं. मात्र आज ते गुजरातमध्ये उपचारासाठी आल्याचं स्पष्ट होत आहे.

अमित शाहांचा हा गुजरात दौरा या आठवड्यातील दुसरा दौरा आहे. यावेळी ते कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत होतं.

लोकसभा निवडणुकीपूर्वी स्वाईन फ्लू

दरम्यान अमित शाह यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी स्वाईन फ्लू झाला होता. स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याने अमित शाह यांना 16 जानेवारी रोजी तातडीने दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर चार दिवसांनी  त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 16 जानेवारी रोजी अमित शाह यांना अचानक ताप आला आणि ताप वाढत गेला. त्यामुळे त्यांना तातडीने एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. शाह यांना स्वाईन फ्ल्यू झाल्याचे निदान झाले होते.

संबंधित बातम्या 

होय, अमित शाहांनी जिथून टीका केली, ते मैदान पवारांनीच बांधलंय   

अमित शाहांची सोलापुरात शरद पवारांवर टीका; आता नातवाचं शाहांना उत्तर   

PHOTO : अमित शाह सिद्धिविनायक चरणी लीन

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली