वर्षा राऊत यांना कोरोना, संजय राऊत यांनाही चाचणी करावी लागणार, काल राऊत-पवार भेटीमुळे टेन्शन वाढलं

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. ( Varsha Sanjay Raut tested Corona positive)

वर्षा राऊत यांना कोरोना, संजय राऊत यांनाही चाचणी करावी लागणार, काल राऊत-पवार भेटीमुळे टेन्शन वाढलं
वर्षा संजय राऊत यांना कोरोनाची लागण
| Updated on: Apr 03, 2021 | 1:23 PM

मुंबई :  शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Sanjay Raut) यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.  गेल्या दोन दिवसांपासून त्यांंना कोरोनाची लक्षणं दिसत होती. अखेर चाचणी केली असता त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. पत्नीला कोरोनाची लागण झाल्याने आता संजय राऊत यांनाही कोरोनाची चाचणी करावी लागणार आहे. (Varsha Sanjay Raut tested Corona positive)

वर्षा राऊत यांना दोन दिवसांपासून कोरोना लक्षणं

गेल्या दोन दिवसांपासून वर्षा संजय राऊत यांना ताप, सर्दी खोकला होता. कोरोनाची लक्षणे असल्याचं समोर आल्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली. ही चाचणी सकारात्मक आली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतल्या फोर्टीस रुग्णालयात दाखल केलं आहे.

संजय राऊत यांनाही चाचणी करावी लागणार

पत्नीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने संजय राऊत यांना नियमाप्रमाणे कोव्हिड चाचणी करावी लागणार आहे. तूर्तास तरी त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याची माहिती आहे.

राऊत-पवार भेटीमुळे टेन्शन वाढलं

राऊतांच्या घरात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्याने आता राष्ट्रवादीच्या गोटातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण, संजय राऊत यांनी नुकतीच ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बराच काळ चर्चा झाली होती. त्यामुळे आता संजय राऊत यांनाही कोरोनाची लागण झाली असेल तर शरद पवार यांचे काय, अशी भीती अनेकांना सतावत आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल काय येतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

(Varsha Sanjay Raut tested Corona positive)

हे ही वाचा :

आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरेंनंतर वर्षा बंगल्यावर आणखी एका कर्मचाऱ्याला कोरोना

पत्नी रुग्णालयात, मुलाचा कोरोनाशी लढा, तरीही धीरोदात्तपणे हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय, आव्हाडांचा मुख्यमंत्र्यांना सलाम