भाजप महिला कार्यकर्त्यांना मारहाणीचा आरोप, माजी महापौर श्रद्धा जाधवांसह 7 शिवसैनिकांवर गुन्हा, अटकेसाठी भाजपचा ठिय्या

| Updated on: Jun 16, 2021 | 7:29 PM

भाजपच्या अक्षता तेंडुलकर यांच्या तक्रारीनंतर शिवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासह 7 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

भाजप महिला कार्यकर्त्यांना मारहाणीचा आरोप, माजी महापौर श्रद्धा जाधवांसह 7 शिवसैनिकांवर गुन्हा, अटकेसाठी भाजपचा ठिय्या
भाजप महिला कार्यकर्त्यांना मारहाण, श्रद्धा जाधवांसह 7 शिवसैनिकांवर गुन्हा
Follow us on

पुणे : राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप युवा मोर्चाने काढलेल्या फटकार मोर्चात मोठा राडा झाला. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्त्यांनाही शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी भाजपच्या अक्षता तेंडुलकर यांच्या तक्रारीनंतर शिवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासह 7 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावेळी अक्षता तेंडुलकर यांनी शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना नाही तर सोनियांची सेना झाली, अशी टीका केलीय. (crime against former mayor Shraddha Jadhav and 7 ShivSena workers )

भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण झाल्याप्रकरणी अक्षता तेंडुलकर यांच्या तक्रारीनंतर माहिम पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यात माजी महापौर श्रद्धा जाधव, राजू पाटणकर, संजय देवळेकर, अक्षय तामोरे, चंदू झगडे, राकेश देशमुख आणि शकी फडके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलन संपल्यानंतर आम्ही परत निघालो असताना काही शिवसैनिकांनी मागून येऊन हल्ला केला. आमदार सदा सरवणकर, श्रद्धा जाधव यांच्या सांगण्यावरुन शिवसैनिकांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप अक्षता तेंडुलकर यांनी केलाय.

‘शिवसैनिकांनी पाठीमागून हल्ला केला’

आंदोलन संपल्यानंतर आम्ही चौघे पार्किंगला लावलेली गाडी काढण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी काही शिवसैनिकांनी आमच्यावर मागून येऊन हल्ला केला. आम्हाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. मारहाणीच्या वेळी श्रद्धा जाधव तिथे पोहोचल्या. त्यांनी शिवसैनिकापेक्षा आधी महिला म्हणून माझा विचार केला पाहिजे होतो. त्यांनी आम्हाला होणारी मारहाण रोखली पाहिजे होती, अशा शब्दात अक्षता तेंडुलकर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

‘शिवसेना नव्हे, ही तर खिल्जी सेना’

शिवसैनिकांनी भाजप युवा मोर्चाचे विलास आंबेकर, सनी साठे, ऋषी शेळमकर यांच्यावर हल्ला केला. त्यांना मारहाणही करण्यात आली. मात्र त्याचवेळी भाजपच्या माहिम विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्ष अक्षता तेंडुलकर यांनाही शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. शिवसैनिकांनी आपल्यावर-एका महिलेवर हात उचलला, ही शिवसेना नव्हे, ही तर खिल्जीसेना आहे, यांचं कसलं हिंदुत्व असा हल्लाबोल अक्षता तेंडुलकर यांनी केला.

गुंडा सेना, हप्तावसुलीवाले आले आहेत हे, आमचे युवा मोर्चेवाले आले, गाडीने जात होतो आम्ही, हे सेनावाले आले आणि आम्हाला मारायला लागले, यांच्या बापाचं आहे का दादर? शिवसेना नव्हे खिल्जीसेना आहे ही, एका बाईवर हात उचलला, यांना हिंदुत्वाचं काही पडलं नाही, असा हल्लाबोल अक्षता तेंडुलकर म्हणाल्या.

कोण आहेत अक्षता तेंडुलकर?

अक्षता तेंडुलकर या भाजपच्या माहिम विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्षा आहेत

अक्षया तेंडुलकर यांची गेल्या वर्षी माहिम विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

कोरोनाच्या काळात त्यांनी या परिसरात अनेक सामाजिक कार्य केले

भाजप माहिम महिला मोर्चाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली

त्यांच्या कामाचा धडाका पाहून त्यांची माहिम विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागली

संबंधित बातम्या :

Video : ‘परिस्थिती हाताबाहेर गेल्यास पोलीस आणि सरकार जबाबदार’, प्रवीण दरेकरांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

VIDEO: शिवसेना भवनासमोरील आंदोलनात राडा, शिवसैनिकांकडून मारहाण झाल्याचा भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांचा आरोप!

crime against former mayor Shraddha Jadhav and 7 ShivSena workers