AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा डाव, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार : विजय वडेट्टीवार

महासेनाआघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री हा शिवसेनेचा होईल, त्याबाबत आम्हाला आनंद आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.

शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा डाव, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार : विजय वडेट्टीवार
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Nov 16, 2019 | 12:06 PM
Share

नागपूर : “शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार झाला आहे. राज्यातील नेत्यांचं एकमत आहे. हा ड्राफ्ट लवकरच हायकमांडकडे पाठवला जाणार आहे, अशी माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar on Maharashtra CM post and Government formation) यांनी टीव्ही 9 मराठीला दिली.

महासेनाआघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री हा शिवसेनेचा होईल, त्याबाबत आम्हाला आनंद आहे, असं वडेट्टीवार म्हणाले. महासेनाआघाडीच्या मसुद्याबाबत दिल्लीत शरद पवार आणि सोनिया गांधी अंतिम निर्णय घेणार आहेत. हायकमांड मसुद्यात काय बदल करायचे असेल त्या सूचना देतील. चर्चा करुन योग्य निर्णय घेऊ, असं वडेट्टीवारांनी सांगितलं.

मुख्यमंत्री शिवसेनेचाच

सरकार बनवायला वेळ लागणार नाही, पण स्थिर सरकार हवं ही आमची भूमिका आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका ही किमान समान कार्यक्रमाबाबत एकमत यासाठी आहे. ते एकमत झालं आहे.  मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल. भाजपने शब्द फिरवल्याने शिवसेनेने काडीमोड घेतला. भाजपने मुख्यमंत्रिपद शिवसेनेला द्यायला हवं होतं. अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद द्यायला हवं होतं. मेहबुबा मुफ्तीसोबत जाऊ शकता, मग शिवसेनेसोबत का नाही? असा सवालही वडेट्टीवारांनी विचारला.

शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा डाव होता. सेनेला मुख्यमंत्रिपद द्यायलाच हवं, ते महासेनाआघाडीत मिळतंय तर आनंद आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.

राष्ट्रवादीचीही जाहीर भूमिका, मुख्यमंत्री शिवसेनेचाच

दरम्यान, काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाची भूमिका स्पष्ट होत असताना, तिकडे राष्ट्रवादीने यापूर्वीच आपली भूमिका जाहीर केली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असं जाहीर सांगितलं आहे. ‘सारखा-सारखा हा प्रश्न का विचारला जातो, की मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार का? मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये वाद झाला होता. त्यामुळे निश्चितच शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार. शिवसेनेला अपमानित करण्यात आलं होतं. त्यांचा स्वाभिमान कायम राखणं ही आमची जबाबदारी आहे’ असं नवाब मलिक ‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.

(Vijay Wadettiwar on Maharashtra CM post and Government formation)

संबंधित बातम्या 

आधी राष्ट्रवादी, आता काँग्रेसचीही भूमिका जाहीर, मुख्यमंत्रिपदाचा तिढा जवळपास निकाली  

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...