AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिव्हाळ्याने पुढे केलेला हात भीक नव्हे, संभाजीराजेंनी अवहेलना केली : विनोद तावडे

कोल्हापूरकरांना भीक नको असं म्हणणाऱ्या खासदार संभाजीराजेंना (Sambhaji Chhatrapati) उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी उत्तर दिलं आहे. पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला मदतीचा हात भीक का वाटावी असा सवाल विनोद तावडे यांनी केला.

जिव्हाळ्याने पुढे केलेला हात भीक नव्हे, संभाजीराजेंनी अवहेलना केली : विनोद तावडे
| Updated on: Aug 20, 2019 | 4:22 PM
Share

मुंबई : कोल्हापूरकरांना भीक नको असं म्हणणाऱ्या खासदार संभाजीराजेंना (Sambhaji Chhatrapati) उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी उत्तर दिलं आहे. पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला मदतीचा हात भीक का वाटावी असा सवाल विनोद तावडे यांनी केला.

तावडे म्हणाले, “बोरिवलीमधील रिक्षावाले, फेरीवाले, मोची, किरकोळ व्यावसायिक, सामान्य नागरिक यांनी आपापल्या कुवतीनुसार १० रुपये, ५० रुपये, १०० रुपये देऊन जमा केलेला निधी म्हणजे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला मदतीचा हात आहे. मग ती रक्कम खासदार संभाजी राजे यांना भीक का वाटावी, असा प्रश्न मला पडला आहे. या आपत्तीच्या वेळी कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील आपल्या बंधू भगिनींना मदत करण्याची सर्वसाधारण माणसाला इच्छा होती आणि त्यासाठी मंत्री असूनही मतदारसंघात फिरून यासर्वांचं प्रेम, त्यांनी देऊ केलेली मदत एकत्र करून पूरग्रस्तांसाठी पाठविली, तर याला भीक का म्हणावे, हा प्रश्न ही मदत देणार्‍या प्रत्येक माणसाला पडला आहे आणि म्हणूनच पूरग्रस्तांसाठी मदत पाठविलेल्या जनतेच्या भावनांचा अनादर होत आहे, असे मला नम्रपणे नमूद करावेसे वाटते”.

गोर-गरीब रिक्षावाले, फेरीवाले, छोटे-छोटे दुकानदार, हातावर पोट असणार्‍या माझ्या गरीब जनतेकडून जमा झालेले १०-१० रुपये मिळून ३.५० लाख रुपये आणि इतर मोठ्या देणगीदारांकडून एकत्र झालेले २४.५० लाख रुपये, अशी एकूण २८ लाखांची रक्कम फक्त बोरिवलीकरांच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आली. हा आमचा खारीचा वाटा आहे, हे आम्हां सर्वांना माहीत आहे, असंही तावडेंनी नमूद केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या या मदतफेरीचे राजकीय द्वेषापोटी विडंबन केले, हे राजकारण म्हणून मी समजू शकतो. कारण, त्यांच्याकडे आता बाकी कोणतेही मुद्दे राहिले नाहीत आणि एका विधानसभेतून पहिल्यांदाच इतका मोठ्या प्रमाणात मदतनिधी जमा होतो, हे त्यांना पहावले नसेल. पण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या राजकीय प्रचाराला संभाजीराजे यांनी बळी पडावे, याचे मला दुःख आहे.

आमच्यासारख्या शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी अडचणीत असलेल्या जनतेला आधार दिला, गोरगरिबांचे प्रेम जमा करून पूरग्रस्तांसाठी पाठविले, याचे संभाजीराजे यांनी खरेतर कौतुक करायला हवे होते. पण त्याची राजे यांनी अवहेलना केली, याची मला खंत वाटते, असं तावडे म्हणाले.

संभाजीराजे नेमकं काय म्हणाले होते?

कोल्हापूर-सांगलीच्या पूरग्रस्तांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी भाजप नेते आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी मुंबईत भीक मागून मदत गोळा केली होती. तावडेंच्या या कृत्याचा राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Chhatrapati) यांनी निषेध केला आहे. स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्याही भीकेची गरज नाही, असं म्हणत संभाजीराजेंनी विनोद तावडेंना घरचा आहेर दिला आहे.

संबंधित बातम्या 

स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाची भीक नको, छत्रपती संभाजीराजेंचा विनोद तावडेंना घरचा आहेर  

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.