वारीस पठाण म्हणतात, आज छ. शिवाजी महाराज असते, तर म्हणाले असते….

वारीस पठाण म्हणतात, आज छ. शिवाजी महाराज असते, तर म्हणाले असते....

मुंबई : “छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर म्हणाले असते, तुम्ही माझ्या पुतळ्यावर एवढा खर्च का करत आहात? त्याऐवजी त्याच पैशातून शाळा, रुग्णालये बांधा”, असे एमआयएमचे आमदार वारीस पठाण म्हणाले. ते ‘टीव्ही 9 मराठी’ वृत्तवाहिनीच्या ‘महाराष्ट्र मंथन’ या कार्यक्रमातील ‘महाराष्ट्र MOST’ या सत्रात बोलत होते. या सत्रात वारीस पठाण यांच्यासह जलसंधारण मंत्री राम शिंदे, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हेही सहभागी झाले होते. कोरेगाव भीमा प्रकरण, संभाजी भिडे, आरक्षण इत्यादी मुद्द्यांवर या सत्रात मान्यवरांनी चर्चा केली.

कोरेगाव-भीम प्रकरणाबाबत सहभागी मान्यवर काय म्हणाले?

प्रकाश आंबेडकर – कोरेगाव भीमा प्रकरणात जे काही पुरावे सापडले, ते फेक आहेत. पोलिसांनी त्यांचे काम नीट केले नाही.

राम शिंदे – कोरेगाव भीमा प्रकरणात सरकारने योग्य काम केले. आम्ही संभाजी भिडेंना पाठीशी घालत नाही. गृहखात्याच मला काही माहित नाही. पण हा विषय हा गृहखात्याच्या संदर्भात आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल 

भंग झालेल्या अपेक्षांचे पडसाद म्हणजे पाच राज्यातील निवडणुकीचे निकाल आहेत, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि मोदींवर निशाणा साधला. या टीकेला उत्तर देताना राम शिंदे म्हणाले, “तीन राज्यांच्या निवडणुकीवरुन देशाच चित्र पालटणार नाही” या मुद्द्याचा धागा पकडत आमदार वारीस पठाण म्हणाले, “सबका साथ सबका विकास असे काहीच झाले नाही. 70 वर्षे झाली देशाला स्वतंत्र होऊन, पण काँग्रेस म्हणा किंवा भाजप कोणीही दलितांसाठी आणि मुसलमानांसाठी काही केले नाही.”

मराठा आरक्षण दिले आहे आणि ते कोर्टात आतापर्यंत टिकलं आहे. धनगर आणि मुसलमांच्या आरक्षणाचा पण प्रश्न लवकर सुटेल, असे आश्वासन यावेळी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दिले.

Published On - 4:51 pm, Sat, 15 December 18

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI